जालना जिल्ह्यात 25 गायी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

उमेश वाघमारे
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

जालना : जालना तालुक्यातील ईदेवाडी व सिरसवाडी शिवारात सुमारे २५ गायी आज (शनिवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या गायींनी थामिठ नावाचे विषारी औषध खाल्याने त्यांचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज आहे.

आज सकाळी ईदेवाडी शिवारामध्ये सकाळी २० ते 25 गाय मृतावस्थेत नागरिकांना आढळून आल्या. त्यानंतर नागरिकांनी या संदर्भात पोलिस प्रशासनासह जिल्हा पशुदैद्यकीय अधिकारी, महसूल प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, तहसीलदार बिपीन पाटील, पशुवैद्यकि अधिकारी जे. एम. बुकतारे यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटना स्थळीच गाईचे शवविच्छेदन केले. या घटनेची माहिती मिळताच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान हा घातपात आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत.