मेंढ्यांच्या कळपात मोटार घुसल्याने नऊ मेंढ्या जागीच ठार

चंद्रकांत देवकते
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मोहोळ (सोलापूर): सोलापूरहुन मोहोळकडे निघालेल्या १०० मेंढरांच्या कळपात भरधाव वेगाने निघालेली मोटार घुसल्याने झालेल्या अपघातात नऊ मेंढ्या जागीच ठार तर चौदा मेंढ्या गंभीर जखमी होऊन सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 10) कोळेगाव शिवारात घडली.

मोहोळ (सोलापूर): सोलापूरहुन मोहोळकडे निघालेल्या १०० मेंढरांच्या कळपात भरधाव वेगाने निघालेली मोटार घुसल्याने झालेल्या अपघातात नऊ मेंढ्या जागीच ठार तर चौदा मेंढ्या गंभीर जखमी होऊन सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 10) कोळेगाव शिवारात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वास लहू कोकणे (वय ३० रा. जळभावी ता. माळशिरस) हा आपल्या मालकीच्या माडग्याळ जातीच्या १०० मेंढरांच्या कळप घेऊन लांबोटीहुन मोहोळकडे निघाले होते. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा कळप कोळेगाव शिवारातून रस्त्याच्या कडेने जात असताना सोलापूरहुन पुण्याकडे निघालेली कार (क्रमांक एम एच १२ के टी ६६१४) या कार चालकाच्या हलगर्जीपणामुळे कार मेंढ्याच्या कळपात घुसून झालेल्या अपघातात नऊ मेंढ्या जागीच ठार झाल्या तर चौदा मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. या अपघातात सुमारे तीन लाख ६५ हजाराचे नुकसान झाल्याची फिर्याद विश्वास लहू कोकणे यांनी दिली आहे. मोटार चालक कयुम कासीम सातारकर (रा. पाटण जि. सातारा) याने हलगर्जीपणाने बेजबाबदार पणे मोटार चालवून मेंढरांच्या कळपात घुसून हा अपघात केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलिस कर्मचारी नागराज निंबाळे करीत आहेत.

अपघाताची खबर मिळताच मोहोळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राजू राठोड, पोलिस हेड कॉन्स्टेबल नागराज निंबाळे, अविनाश शिंदे आदींसह अपघात पथक घटनास्थळी पोहचले. अस्ताव्यस्थ पडलेल्या मेंढ्या बाजूला करूनन जखमी मेंढ्याना मोहोळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी तात्काळ दाखल केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जगदाळे यांनी त्वरित उपचार केल्याने अनेक मेंढ्याचे प्राण वाचले.