भविष्य

मेष:
नातेवाइकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृषभ:
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे.
मिथुन:
गेल्या काही दिवसांपेक्षा आजचा दिवस अनेक दृष्टीने चांगला जाईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. विरोधकावर मात कराल.
कर्क:
तुमच्यावर एखादी जबाबदारी येऊन पडण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक क्षेत्रात वावरताना काळजी घ्यावी. काहींना नोकरीमध्ये बदलीचे प्रश्‍न सतावतील.
सिंह:
अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. व्यवसायामध्ये उलाढाल करू शकाल. तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल.
कन्या:
जिद्द व चिकाटी वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या राहत्या घराचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील.
तूळ:
व्यवसायामध्ये नवीन उलाढाल करू शकाल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक:
नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कामाचा ताण व दगदग जाणवेल. सध्या आपल्याला कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करून चालणार नाही.
धनु:
खर्चाचे प्रमाण कमी होईल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. रखडलेली कामे व दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. संततिसौख्य लाभेल. विरोधकावर मात कराल.
मकर:
प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य चांगले राहील. प्रवासात दक्षता घ्यावी. नातेवाइकांसाठी खर्च कराल. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कुंभ:
नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. नातेवाइकांचा सल्ला महत्त्वाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी उपयुक्‍त ठरेल.
मीन:
बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्‍टर्स, डेव्हलपर्स तसेच ज्वेलर्स या व्यवसायातील व्यक्‍तींना आजचा दिवस विशेष लाभदायक जाईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
रविवार, एप्रिल 15, 2018 ते शनिवार, एप्रिल 21, 2018
मेष:
अक्षय्यतृतीया अतिशय फलदायी राशीतली अमावास्या ग्रहयोगांतून अतिशय अपवादात्मक. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना निश्‍चितच दखलपात्र. ता. 15 व 16 हे दिवस कमालीचे असुरक्षित. काळजी घ्या. बाकी, कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना यंदाची अक्षय्यतृतीया अद्वितीय स्वरूपाची फळं देणारी. विवाहयोग. महत्त्वाच्या गुंतवणुकी कराल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना जलभय.
वृषभ:
टारगट मित्रांची संगत टाळा अमावास्येच्या आसपासच्या काळात तरुणवर्गानं जपून राहावं. टारगट मित्रांची संगत टाळावी. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या वाहनांसंदर्भात धोकादायक. बाकी, मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 18 व 19 हे दिवस सुवार्तांचे, फ्लॅश न्यूजचे! मात्र, खरेदी करताना सावधान. मोह आवरा! शनिवार ठेचकाळण्याचा.
मिथुन:
नोकरीच्या मोठ्या सुसंधी पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात गुरू-शुक्रांच्या विशिष्ट स्थितीतून मोठे लाभ. सप्ताहात नोकरीच्या मोठ्या संधी. शुक्रवार विशिष्ट जल्लोषाचा. स्पर्धात्मक यश. बाकी, मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या विचित्र खर्चाची. पाकीट जपा. वाहनांचा त्रास. विद्युतउपकरणापासून जपून राहा.
कर्क:
नोकरीत गटबाजीत पडू नका अमावास्येचं फील्ड अपवादात्मक ग्रहयोगांचं. ता. 15 ते 17 हे दिवस जनसंपर्कातून खराब. काहींना नोकरीतल्या गटबाजीतून त्रास. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना घरगुती वादांच्या पार्श्‍वभूमीवर अमावास्या अतिशय प्रतिकूल. काळजी घ्या. यंदाची अक्षय्यतृतीया आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचं संकटविमोचन करणारी. तरुणांचं नैराश्‍य जाईल. परदेशी नोकरी.
सिंह:
सार्वजनिक जीवनात जरा जपून! अपवादात्मक अशी फळं देणारा सप्ताह. अर्थातच तरुणांना एखादं भव्य यश मिळेल. ता. 18 व 19 हे दिवस यश-प्रसिद्धीतून झळाळी देणारे. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना काही खणखणीत फळं मिळतील. बाकी, अमावास्या मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सामाजिक जीवनात वादळी ठरू शकते. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार बेरंगाचा.
कन्या:
अपरिचित व्यक्तींशी वाद नको अमावास्येचं फील्ड उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय विचित्र फळं देईल. अपरिचित व्यक्तीशी वाद टाळा. गर्दीच्या ठिकाणी सावधानपूर्वक वागा. डोळे जपा. बाकी, ता. 18 व 19 हे दिवस चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उलाढालीतून शुभ. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारची संध्याकाळ कलहजन्य. स्त्री वाद घालेल.
तूळ:
स्त्रीवर्गानं मनावर ताबा ठेवावा सप्ताह ग्रहयोगांतर्गत मोठ्या घडामोडींचा. अमावास्येचं फील्ड शत्रुत्वाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिकूल. हा सप्ताह स्त्रीवर्गाला जास्त उपद्रवमूल्य असलेला, चित्रा नक्षत्राच्या व्यक्‍तींना प्रचंड मानसिक दडपणाचा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गजन्य बाधेची शक्‍यता. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार सुवार्तांचा. फ्लॅश न्यूजचा!
वृश्चिक:
अहंकारापासून दूरच राहा हा सप्ताह अहंकारी व्यक्तींना प्रचंड डाचणारा. अमावास्येच्या आसपासच्या काळात क्रिया-प्रतिक्रिया देताना काळजी घ्या. नोकरीतल्या वातावरणामुळं अस्वस्थ राहाल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 19 व 20 हे दिवस शुभग्रहांच्या खेळीतून लाभदायक. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या आणि शनिवार सहजीवनातून काटेरी.
धनु:
व्यावसायिक जुगार टाळा उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्राच्या विशिष्ट स्थितीचा मोठा लाभ होणार आहे. शुक्रवार सुवार्तांचा, जल्लोषाचा. मात्र, वक्री शनीच्या पार्श्‍वभूमीवर मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवार दखल घेण्याजोगा. कुसंगती टाळा. व्यावसायिक जुगार टाळा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पितृचिंता.
मकर:
नवे प्रश्‍न निर्माण करू नका! सप्ताह अतिशय संमिश्र स्वरूपाचा. सप्ताहात वक्री होणार शनी एक जाहीरनामा घोषित करेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 16 व 17 हे दिवस प्रतिकूलच. जीवनात नवे प्रश्‍न निर्माण करू नका! श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना अक्षय्यतृतीया शुभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार मोठ्या गुरुकृपेचा.
कुंभ:
महत्त्वपूर्ण गुंतवणूक कराल सप्ताहात हाडांच्या दुखापतीची काळजी घ्या. अमावास्या प्रवासात चोरीची. स्त्रीशी हुज्जत घालू नका. अमावास्येच्या आसपासच्या काळात धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी स्वतःच्या वागण्यासंदर्भातविशेष काळजी घ्यावी. बाकी, पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा जीवनातला स्टेक वाढेल! अर्थातच काही गुंतवणुकी कराल. ता. 19 व 20 हे दिवस समाधानकारक उलाढालीचे! शततारका नक्षत्राच्या व्यक्ती शहेनशहा बनतील!
मीन:
सहजीवनात पथ्य पाळाच सप्ताहातली अमावास्या ग्रहयोगांतर्गत लक्ष्यवेध घेणारी! मानसिक, शारीरिक आणि सहजीवनांतर्गत पथ्यं पाळाच. नाहीतर भडका उडू शकतो. अमावास्या रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना उलघालीची. उष्माघातापासून जपा. घरातल्या गर्भवतीमुळे धावपळ शक्‍य. अक्षय्यतृतीया तरुणांना नोकरीत भाग्योदयाची! शनिवारी स्त्रीची भुणभुण.

ताज्या बातम्या