औरंगाबाद शहरात कोम्बिंग; आंदोलकांची धरपकड
औरंगाबाद : शहरातील शंभूनगर, जवाहरनगर, आंबेडकरनगर भागात तणावग्रस्त परिस्थिती असून पोलिसांनी तेथे कोम्बिंग ऑपरेशन राबवले आहे. आज (बुधवार) सकाळी साडेअकरापासून हे ऑपरेनश सुरु असून, अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शंभूनगर भागात सुमारे पाचशेपेक्षा अधिक पोलिसांना पाचारण करण्यात आले असून ते आंदोलकांची धरपकड करीत आहेत. संजयनगर भागातही काहीवेळापूर्वी तणाव झाला. आंबेडकरनगर भागात एक वाहन पेटवण्यात आले, त्यानंतर येथील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी लाठीमार केला आहे.