पुण्यात हडपसरमध्ये कडकडीत बंद
हडपसर : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला हडपसर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला व ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी मिलिंद एकबोटे व भिडे गुरूजी यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच सरकारचा जाहिर निषेध केला. या घटनेची चौकशी करून आंदोलन घडवून आणलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील व विष्णू पवार यांनी निवेदन स्वीकारले.

दरम्यान सोलापूर रस्त्यावर दोन पीएमपी बसेसवर दगडफेक तसेच भेकराईनगर येथील एका दुकानावर दगडफेक झाल्याच्या किरकोळ घटना वगळता बंद शांतते पार पडला. पोलिस तत्काळ पोहचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
खासगी शाळा, महाविद्यालयां सोबतच खासगी प्रवासी वाहतूक धारक बंदमध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर रामटेकडी चौकात देखील रामटेकडी येथील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केले व मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती. दरम्यान, वानवडी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.