कॅनडाचा 'इंग्लिश' अनुभव

कॅनडाचा 'इंग्लिश' अनुभव

'How is my English?

Call : (तुमचा दुरध्वनी क्र)

" कॅनडासारख्या बहुभाषिक, बहुसांकृतिक देशात वेगवेगळी व्यक्तिमत्वे भेटत असल्यामुळे एक प्रकारचा आनंद मिळतो, अनेक गोष्टींची माहिती मिळते. नवीन शिकायला मिळतं (मीच शहाणा, हुशार या आपल्या समजुतीवर पडदा पडतो.)

वेळेचा शिस्त, काटेकाेरपणा, स्वच्छता या घेण्यासारख्या गाष्टीआहेत. त्याचवेळी इतरही आपल्यापासुन शिकत असतीलचं की? (चांगलं, वाईट हा संशोधनाचा मोठा वेगळा विषय आहे). इथे बहुतांश लोकांची मातृभाषा ही बिगरइंग्रजी आहे. त्यामुळे स्थलांतरित व्यक्ति/लोक आपआपल्या परीने English सुधारण्याचा, संभाषणकलेत प्राविण्य मिळविण्याचा प्रयत्न करतात. कार्यालयात सहकार्यांच्या एकामेकांमधील संवादातुनही बरेच पैलु बाहेर पडतात.

इंग्रजी सुधारण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सतत कानावर रेडिओतील कार्यक्रम (बातम्या, मुलाखती इत्यादी) काळजीपुर्वक ऐकणे (व समजुन घेणे) हा सहकाऱयाचा (मुळ युक्रेनचा) मोलाचा सल्ला मीही पाळत होतो. रेडिओ त्याचाच व कायम चालु असायचा व मला ही मोफत संधीच होती. पण काय कोण जाणे, हा इंग्रजीबद्दल काही वाक्य, शब्दरचना (किंवा Drawing वरच्या Notes) याबद्दल काही अडलं किंवा स्पष्टीकरण पाहिजे असल्यास माझ्याकडे यायचा.

मी बऱयाच वेळेला सांगितलं त्याला की इथले जे स्थानिक लोक आहेत, ज्यांचं मुळ व अधिकार इंग्रजी आहे, त्या लोकांचं म्हणणं/सल्ला प्रमाणभुत मानला पाहिजे. पण, न्युनगंड किंवा आपलंस करुन घेण्याची माझी वृत्ती, पटवुन देण्याची कला (हा माझा गैरसमच) यामुळे त्यानं माझा सल्ला घेणं व माझ्या अहंकाराला खतपाणी घालणं चालुचं ठेवलं.

खरंतर त्याचं इंग्रजी माझ्यापेक्षा सरस आहे. एकदा त्यानं मलाचं विचारलं ,

"Ajit, How is my English?"

झाली की आता पंचाईत!

"तुझं इंग्रजी फार चांगलं म्हणलं" तर मी नाटकी वाटणार, "नाही" म्हणालो तर मी हे प्रमाणपत्र देणारा कोण?

बरं सगळे एकाचं बोटीचे वारकरी

(We all are in the same Boat).

काय उत्तर द्यावं ,करावं सुचेना. माझ्या कुचकट, चावट स्वभावामुळं नको त्या वेळी, नको त्या गोष्टी सुचतात. कदाचित कधी, कधी असा स्वभाव (भवसागर नसला तरी) प्रसंग तारु शकतात, असा अनुभव आला. एकदम आठवलं , या वाक्याचा इथं उपयोग करुन वेळ मारुन नेता येईल का? कुठलं ते तारक वाक्य? इकडे बऱयाच सार्वजनिक, सरकारी इ वाहनांवर मागच्या बाजुला लिहिलेलं असतं.

"How is my Driving? Call: Phone No"

मला मार्ग सापडला, मी त्या सहकाऱयाला म्हणालो, आपणं असं करायचं का?

आपल्या कारच्या माग असं लिहिलं तर,

"How is my English?

Call : (दुरध्वनी क्र )"

यानंतर काय घडलं ते सांगणे न लगे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com