अमेरिकन निवडणूक प्रचारातील सुखद अनुभव

hillary clinton us presidential election
hillary clinton us presidential election

मी मुळची पुण्याची! अभियांत्रिकीची पदवी घेऊन लग्नानंतर अमेरिकेला गेले. तेथे पोस्ट ग्रॅज्युएशन करून वेगवेगळ्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम केले. नंतर काही काळासाठी ब्रेक घेतला. त्या कळात स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये डिप्लोमा करत असताना तेथील पोलिटिकल सायन्स डिपार्टमेंने आयोजीत केलेली जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तिंची लेक्चर्स अटेन्ड करता आली. त्यात प्रेसिडेन्ट बराक ओबामा यांचे लेक्चर ऐकायला मिळाले. माझा राजकारणाशी तसा काहिही संबंध नसताना त्यांचे भाषण ऐकून मी प्रभावीत झाले. त्यावेळी अमेरिकेत काही गोळीबाराचे प्रकार घडले अन् त्या अनेकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील ‘गन कन्ट्रोल’ या विषयावर ते अत्यंत आत्मीयतेने बोलले. त्यांच्या पक्षाच्या पुढील उमेदवार हिलरी क्लिंटन याबाबबत काम करू इच्छितात व त्यांना तुम्ही निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यामूळे या पक्षासाठी काहीतरी काम करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली.

मी डेमॉक्रॅटिक पार्टिच्या ऑफिसशी संपर्क साधला व काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला तात्काळ ही संधी दिली. कॉलिफोर्नियामधील सॅक्रॅमॅन्टो या राजधानीच्या गावी त्यांनी क्लिंटन यांच्या प्रचारासाठी ऑफिस उघडले होते. साधारण 50 व्हॉलेन्टियर्सना आठवड्यातून 15 ते 20 तास (3 दिवसांसाठी) बोलावण्यात येत असे. हे सर्व व्हॉलेन्टियर्स स्वेच्छेने आणि स्वखर्चाने काम करण्यासाठी येऊ लागले. यातील बरेचसे व्हॉलेन्टियर्स हे निवृत्त झालेले लोक होते. या मध्ये महिलांची संख्या 80 टक्के होती. वय वर्षे 15 ते 20 या वयोगटातील तरूण महिला स्वयंसेवक पण होत्या. काही पोलिटिकल सायन्स या विषयाचे विद्यार्थी पण होते. हिलरी क्लिंटन यांनी निवडून यावे यासाठी त्या सर्वजण हिरिहिरिने प्रयत्न करीत होत्या. यामध्ये मी एकटीच भारतीय होते.

कामाचे सर्वसाधारण स्वरूप असे होते की, क्लिंटन यांच्यासाठी जी अवघड राज्ये होती- जसे की नेवाडा, आयोवा, फ्लोरिडा या राज्यातील मतदारांशी फोनवर संपर्क साधून त्यांचा कल काय आहे हे जाणून घेणे. केवळ 2 मिनिटांच्या फोनमध्ये. क्लिंटन यांची कामगिरी समजाऊन सांगून त्यांना मत देण्याची विनंती केली जाई. मतदाराशी संपर्क साधल्यावर त्या मतदाराने आपल्या पार्टिच्या उमेदवाराला मतदान करावे यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही किंवा प्रलोभन दाखवायचे नाही असा अमेरिकेतील निवडणूक आयोगाचा महत्वाचा नियम आहे. आम्हा सर्वांना या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे सांगण्यात आले होते. मतदाराने तो विरोधी पक्षाचा आहे असे सांगितल्यावर त्याला धन्यवाद देऊन फोन बंद केला जाई. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व मतदाराला न दुखावता हे काम केले जाई. त्याचे मत बदलण्याचा कोणत्याही तर्‍हेचा प्रयत्न आम्ही करत नसू. मतदारांच्या वयक्तीक हक्काला कुठेही धक्का लावायची परवानगी आम्हाला नव्हती. क्लिंटन यांना मतदान करू इच्छिणाऱया लोकांना काही दिवसांनी मतदानाबद्दल आठवण करून देत असू.

मला साधारणपणे 500 मतदारांशी फोनवर प्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळाली. सर्व मतदार फोनवर विनम्रपणे बोलणारे निघाले. त्यांच्याशी बोलताना मला कोणत्याही प्रकारच्या वाद विवादाला तोंड द्यावे लागले नाही. मतदारांची मते संगणकाद्वारे रोजच्या रोज पार्टिच्या स्टेट हेड ऑफीसला पाठवली जात असत व त्यातून महत्वपूर्ण व माहितीपूर्ण असा डाटा बेस निर्माण केला गेला.

हिलरी क्लिंटन या स्वतः निरनिराळ्या रॅलिजमध्ये स्वतःचा प्रचार करत असत. मला कुठेही निवडणुकीचे पोस्टर, बॅनर्स, फ्लेक्स लावलेले आढळले नाही की लाऊड स्पिकरचा गोंगाट ऐकू आला नाही. पार्टी ऑफीसमध्ये छोटे बोर्ड विकत मिळत होते. हे बोर्ड विकत घेऊन लोक आपल्या घरासमोर लावू शकत होते. क्लिंटन यांच्या रॅलिमध्ये सहभागी होण्यासाठी 200 डॉलर्स ते 50,000 डॉलर्स या रेंजमधली ऐच्छीक तिकिटे उपलब्ध असायची. अशा रितीने निवडणुकीसाठी फंड गोळा केला जात होता. हिलरी क्लिंटन यांना लोकांनी स्वेच्छेने भरपूर आर्थिक सहाय्य केले. एकेका रॅलीत 10 हजार लोक उपस्थीत रहात असत. हिलरी क्लिंटन यांनी स्वतः पार्टी ऑफीसमध्ये येऊन माझ्यासारख्या व्हॉलेन्टियर्सचे आभार मानले आणि आमचे काम करण्याचा उत्साह वाढवला. पार्टिच्या सभासदांमध्ये मला कुठलेही मतभेद आढळून आले नाहीत. आपल्या उमेदवाराला निवडून आणणे हाच एकमेव उद्देश होता. हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारामध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, त्यांच्या मनात कुठल्याही जाती धर्माबद्दल आकस नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गन कन्ट्रोल या महत्वाच्या विषयाला त्यांनी खूप महत्व दिले असून, अमेरिकन नागरिकांचे जीवन अधीक सुरक्षीत बनवण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.

कॅलिफोर्निया राज्यात क्लिंटन यांच्या प्रचारासाठी मुठभर भारतीय लोक काम करत होते. त्यांच्यापैकी मी एक होते याचे मला समाधान आहे. थोडक्यात, मला अत्यंत स्वच्छ व पारदर्शी अशा निवडणूक प्रचाराचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
(शब्दांकन : उल्हास हरी जोशी)

-------------------------------------------------------------
माझ्या नजरेतून निवडणूक अमेरिकेची
अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील सर्वात चुरशीची आणि वादग्रस्त निवडणूक म्हणून हिलरी क्लिंटन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्या लढतीकडे जग पाहते आहे.

आपल्यापैकी अनेकजण या लढतीचा अमेरिकेत प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. मतदानाला अवघे काही तास राहिले आहेत. जगावर परिणाम घडवू पाहणाऱया या निवडणुकीचे आपल्या शब्दात लाईव्ह वार्तांकन eSakal.com च्या द्वारे आपण सर्व मराठी वाचकांपर्यंत पोहचवू शकता.

त्यासाठी फक्त इतकेच कराः
1. आपले मत, लेख, बातमी युनिकोडमध्ये टाईप करा.
2. आम्हाला इ मेल करा webeditor@esakal.com वर
3. Subject मध्ये नोंदवाः USElection
-------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com