लंडनमध्ये साजरा होणार मराठी संस्कृतीचा जागर

केदार लेले
गुरुवार, 1 जून 2017

लंडन: लंडन मराठी संमेलनाच्या (एलएमएस) निमित्ताने महाराष्ट्र मंडळ लंडनचा 85वा वर्धापन सोहळा 2, 3 आणि 4 जूनला साजरा होणार असून, तो महाराष्ट्रीय उद्योजकतेचा, संस्कृतीचा आणि चैतन्याचा एक मोठा उत्सव असणार आहे.

पूर्व इंग्लंडच्या नौदलाचे प्रादेशिक कमांडर कमोडोर डेविड एलफोर्ड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. लंडन मराठी संमेलनाचे प्रमुख पाहुणा होण्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराबद्दल दाखवलेल्या दूरदृष्टीचादेखील उल्लेख केला आहे.

लंडन: लंडन मराठी संमेलनाच्या (एलएमएस) निमित्ताने महाराष्ट्र मंडळ लंडनचा 85वा वर्धापन सोहळा 2, 3 आणि 4 जूनला साजरा होणार असून, तो महाराष्ट्रीय उद्योजकतेचा, संस्कृतीचा आणि चैतन्याचा एक मोठा उत्सव असणार आहे.

पूर्व इंग्लंडच्या नौदलाचे प्रादेशिक कमांडर कमोडोर डेविड एलफोर्ड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. लंडन मराठी संमेलनाचे प्रमुख पाहुणा होण्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराबद्दल दाखवलेल्या दूरदृष्टीचादेखील उल्लेख केला आहे.

युके मध्ये अस्थिमज्जा दाता नोंदणीपुस्तक असते. त्यामध्ये अस्थिमज्जा दान करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची माहिती असते. अस्थिमज्जा देणारा आणि घेणारा हे जेवढे पारंपरिक/वांशिक प्रकारे जोडले असतात तेवढ्याच प्रमाणात त्याची स्वीकृती होण्याचे प्रमाण जास्त असते. आशियाई दात्यांची नोंदणी ही यूरोपीय देणगीदारांपेक्षा फारच कमी आहे. एखाद्या भारतीय माणसाचा जीव अस्थिमज्जा प्रत्यारोपणाने वाचू शकत असेल तर अस्थिमज्जा दाता नसल्याकारणाने तो वाचू शकणार नाही. एलएमएसच्या निमित्ताने "रिया दांडेकर अस्थिमज्जा प्रकल्प" हाती घेतला आहे. यामध्ये पात्र असलेल्या उपस्थित लोकांची नोंदणी करण्यात येणार आहे. काही वर्षांपूरवी बर्मिंगहॅममध्ये रिया दांडेकर या तरुण महिलेचा योग्य तो दाता न मिळाल्यामुळे मृत्यू झाला होता. एलएमएसच्या निमित्ताने आम्ही आशा करतो की अशी वेळ पुढे चालून कुणावर न येवो

'एलएमएस'मध्ये भारतातून येणाऱ्या आणि स्थानिक कलाकारांचा योग्य तो समन्वय असणार आहे. स्थानिक कलाकार एक प्रभावी असा रॅम्प वॉल्क/फॅशन शो करणार आहेत. 'एलएमएस'मध्ये मिस टीन कॉन्टिनेन्टस युके, अंजली सिन्हा येणार आहे. तिने मिस टीन कॉन्टिनेन्टस पेजेंट 2016 ही स्पर्धा जिंकली आहे. 'एलएमएस'मध्ये भारतातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. यामध्ये रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका, पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ, बडवे इंजिनीरिंग लिमिटेडचे श्रीकांत बडवे व आरकेज होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे राजेश खानविलकर यांचा समावेश आहे.

भारत विकास ग्रुप (बिव्हीजी)चे एच. आर. गायकवाड हे संमेलनाचे मुख्य प्रायोजक आहेत. लंडन मराठी संमेलन आणि महाराष्ट्र मंडळ लंडनच्या पदाधिकाऱयांनी त्यांचे आभार मानले आहेत. शिवाय, आमचे इतर प्रयोजकांचे देखील आभारी असल्याचे पदाधिकाऱयांनी सांगितले. ट्रॅव्हल पार्टनर-मँगो हॉलीडेस, केटरिंग पार्टनर-रोशनीस फाईन इंडियन डायनिंग, लॉजिस्टिकस पार्टनर-युनिक एयर एक्सप्रेस आणि आमचे रेडिओ पार्टनर-nusound रेडिओ.

'एलएमएस'ची मध्यवर्ती समिती व स्वयंसेवक जगभरातून येणाऱ्या कलाकारांचे, प्रतिनिधींचे, उद्योजकांचे, पाहुण्यांचे व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करायला उत्सुक आहेत. अधिक माहिती www.lms2017.org.uk या संकेतस्थळावर आहे.

पैलतीर

महाराष्ट्र मंडळ फ्रान्सने या वर्षी आपला दहावा गणेशोत्सव साजरा दणक्यात साजरा केला. विशेष म्हणजे या वर्षी कार्यक्रमासाठी ...

बुधवार, 13 सप्टेंबर 2017

आम्ही सगळेजण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट मेलबर्नमधले मराठी. म्हणजे पु. ल. आज असते, तर ते आम्हाला 'ऑस्ट्रेलियन महाराष्ट्रीयन...

रविवार, 3 सप्टेंबर 2017

China Pakistan Economic Corridor (C-PEC) ला ’सीपेक’ या संक्षिप्त नांवाने ओळखले जाते. याची खरी गरज चीनलाच आहे यात मुळीच शंका नाहीं...

बुधवार, 30 ऑगस्ट 2017