अमेरिकेत यंदा धमाकेदार 'बाप्पा मोरया' 

टीम ई सकाळ
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

वर्षी गणपतीच्या शुभमुहूर्तावर अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को, कॅलिफोर्निया येथे गेली अनेक वर्षे वास्तव्य असलेले संगीतकार विश्वास गोडबोले आणि गीतकार प्रीती देशपांडे यांनी, पुणेस्थित संयोजक सचिन जांभेकर यांच्या समवेत आपल्या सर्वांच्या भेटीला एक धमाकेदार, गणपती बाप्पाचे स्वागत करणारे "बाप्पा मोरया" हे गाणे आणले आहे जे गायलेय ते राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित महेश काळे यांनी!  

ऑगस्ट लागला की गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आपण सगळेच आतूर होतो आणि उत्साहाने तयारीला लागतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्तमोत्तम संगीतकार, गीतकार, गायक कलाकार बाप्पाची नवनवीन गाणी दर वर्षी घेऊन येतात. पण हे केवळ भारतातच घडते असे नाही. यावर्षी गणपतीच्या शुभमुहूर्तावर अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को, कॅलिफोर्निया येथे गेली अनेक वर्षे वास्तव्य असलेले संगीतकार विश्वास गोडबोले आणि गीतकार प्रीती देशपांडे यांनी, पुणेस्थित संयोजक सचिन जांभेकर यांच्या समवेत आपल्या सर्वांच्या भेटीला एक धमाकेदार, गणपती बाप्पाचे स्वागत करणारे "बाप्पा मोरया" हे गाणे आणले आहे जे गायलेय ते राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित महेश काळे यांनी!  

५ ऑगस्ट २०१७ रोजी हे गाणे अमेरिकेत प्रकाशित करण्यात आले असून गणेशचतुर्थीच्या शुभदिनी ते सर्व रसिकांसाठी उपलब्ध करण्यात येईल.  

महेश यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने आपल्या सर्वांच्याच मनात एक विशेष स्थान मिळवलेले आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने केवळ बे एरियातच नव्हे तर जगभरातील भारतीय कुटुंबांमध्ये बाप्पाचे जोरदार स्वागत महेश काळेंच्या निरागस सूरांनी व्हावे, सर्वांच्या घरातील काना-कोपरा महेशजींच्या जादुई आवाजातील बाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमून निघावा...

थोड्याच दिवसात संगीतकार विश्वास आणि गीतकार प्रीती त्यांचा "मी ती प्रीती" हा १२ मराठी गाण्यांच्या संच प्रकाशित करत आहेत. गाण्यांचे संयोजन केले आहे श्री. जांभेकर यांनी.

१२ पैकी १० गाण्यांचे रेकॉर्डिंग नील गोडबोले यांनी त्यांच्या बर्कली (Berkeley, California) येथील एअरशीप लॅब्ज या अद्ययावत स्टुडिओमध्ये केले आहे. महेश यांची २ गाणी जांभेकरांनी पुण्यातील स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केली आहेत. फ्रिमॉन्ट (Fremont, California) येथील ज्योती ब्रह्मे यांनी सीडी कव्हर पेजचे ग्राफिक डिझाईन केले आहे.

या १२ गाण्यांच्या संचामध्ये श्री. काळे यांनी गायलेल्या "बाप्पा मोरया" व "न्याय" या दोन गाण्यांसमवेत बे एरिया मधील प्रसिद्ध गायिका मधुवंती भिडे, अनुपमा चंद्रात्रेय यांनी व इतर प्रथितयश कलाकारांनी गायलेल्या लावणी पासून ते मीरेच्या भजनापर्यंत विविध रंगांनी सजलेल्या भावपूर्ण गाण्यांचाही समावेश आहे. 

"मी ती प्रीती" ची संकल्पना ते "मी ती प्रीती" हा पूर्ण १२ मराठी गाण्यांचा संच हा प्रवास खूपच स्मरणीय आहे. या प्रवासात अनेक कुटुंबीयांचा आणि मित्र-मैत्रिणींचा मोलाचा सल्ला, सहभाग व सहकार्य "मी ती प्रीती"च्या टीम ला मिळाले.