रंकाळवेस तालीम अन्‌ शाहूपुरी कुंभार गल्ली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

रंकाळवेस तालीम मंडळाची मूर्ती शाहूपुरी कुंभार गल्लीतील ज्येष्ठ मूर्तिकार के. आर. कुंभार गेली पन्नास वर्षे तयार करतात. प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीदिवशी रात्री साडेआठला मंडळ मूर्ती नेण्यासाठी येते. श्री. कुंभार यांचा सत्कार करतात आणि मूर्ती घेऊन जातात. गल्लीतील अनेक कुटुंबं या गणपतीचे औक्षण करून नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतर मग रात्रीचे जेवण करतात. गेली पन्नास वर्षे ही परंपरा जपली गेली आहे. 

वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षीच खडकीच्या शाडूतून गणेशमूर्ती तयार करणारे के. आर. कुंभार गेली 65 वर्षे मूर्तिकाम करतात. या हातांनीच पुढे अनेक हिंदी, मराठी आणि प्रादेशिक चित्रपटांच्या "प्रमोशन्स'साठी देशभरातील प्रमुख शहरांत पोस्टर पेंटिंग केली. त्याशिवाय त्यांच्या भव्य व आकर्षक एकवीस, अकरा फुटी गणेशमूर्तींनी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला उंची मिळवून दिली आणि पुढे पंचगंगा प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आल्यावर त्यांनीच पहिल्यांदा 2012 रोजी अकरा व एकवीस फुटी मूर्ती तयार न करण्याचा निर्णय घेतला आणि आजवर तो तंतोतंत पाळला. 

पुणे फेस्टिव्हलमध्ये "भालकर्स'चे नृत्य दिग्दर्शन 
संगीत, नृत्य, नाट्य, गायन, वादन, क्रीडा आणि एकूणच मराठमोळ्या संस्कृतीला सलाम करणारा पुणे फेस्टिव्हल जगप्रसिद्ध आहे. यंदाच्या फेस्टिव्हलला कालपासून प्रारंभ झाला आणि पुढे पाच सप्टेंबरपर्यंत त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असेल. ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई, ज्येष्ठ अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत एक सप्टेंबरला मुख्य उद्‌घाटन सोहळा होणार असून, त्यातील विविध नृत्याविष्कारांचा मान यंदा येथील भालकर्स कला अकादमीला मिळाला आहे.

"महाराष्ट्र देशा, शिवबांच्या देशा' या संकल्पनेवर नृत्याविष्कार सादर होणार असून, धनंजय भावलेकर यांची संकल्पना आहे. त्यात अभिनेत्री भार्गवी चिरमुले, नंदेश उमप, अभिनेता अभ्यंग कुवळेकर यांचा सहभाग असेल. भालकर्स कला अकादमीचे युवा नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर येथील तीस तरुणांचा संच घेऊन पुण्याला रवाना होणार आहेत. कोल्हापूर डान्स असोसिएशनच्या कलाकारांचाही या कलाविष्कारात सहभाग असेल.