तरुणाईच्या ‘स्पेस’चं नाटक...!

तरुणाईच्या ‘स्पेस’चं नाटक...!

वादिराज लिमये या तरूण लेखकाचं आजच्या तरूणाईविषयी बोलणारं ‘बिलिव्ह इन’ नाटक रविवारी रूद्रांश ॲकॅडमीच्या टीमनं सादर केलं.

तरूणाईला मिळालेलं स्वातंत्र्य, त्याकडे तिचा सध्या पाहण्याचा दृष्टीकोन आणि एकूणच नातेसंबंध अशा अनुषंगाने नाटक वर्तमानावर भाष्य करते. रूद्रांश ॲकॅडमी ही नृत्यविषयक प्रशिक्षण देणारी संस्था आता नाट्य क्षेत्रातही वेगवेगळे प्रयोग करू पहाते आहे. त्यातीलच हा सुध्दा एक प्रयोग. 

मुळात स्वातंत्र्य, नातेसंबंध आणि आयुष्यातील विविध अडचणींवर मात करतानाचा संघर्ष, या साऱ्या गोष्टी नाटकाचा विषय अगदी पहिल्यापासून राहिला आहे. मात्र, सोशल मीडियाचा विळखा घट्ट होत गेला तसा तोही नाटकात येवू लागला. एरवी स्वातंत्र्याचा पूर्णपणे उपभोग घेणाऱ्यांना प्रत्यक्ष नातं जपताना कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि शेवटी निस्वार्थी प्रेम, विश्‍वास या गोष्टी किती महत्वाच्या आहेत, याची जाणिव होवू लागल्यानंतर त्यांच्यात होवू लागणारा बदल असा प्रवास करत नाटक संपतं. बाकी तांत्रिक बाजू नाटकाला पूरक आणि यथायोग्य. एक गोष्ट मात्र नक्की आहे, कोल्हापूरकर स्पर्धा एन्जॉय करतात आणि अगदी प्रेक्षकांच्या स्वागतासाठी रांगोळ्याही काढतात. शेवटी हे नाटकावरचं प्रेमच.

पात्र परिचय
 समीर पंडितराव (सिद्धार्थ), विनयकुमार शिंदे (सतीश), स्वरूपा फडके (गार्गी), शाल्वी शाह (तनया), सुहास लकडे (इन्स्पेक्‍टर जमदाडे).
 दिग्दर्शक- स्नेहलराज संकपाळ
 सूत्रधार- दीपक बिडकर
 नेपथ्य- मंगेश कांबळे, नीलेश बोडके
 प्रकाश योजना- अंकुश कुलकर्णी, रोहित पोतनीस
 पार्श्‍वसंगीत- पवन लांब
 रंगभूषा- शशी यादव
 वेशभूषा- पार्थेश कुंभोजकर, शेखर गुरव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com