#MarathaKrantiMorcha सोलापुरात कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेला आजचा सोलापूर बंद कडकडीत झाला. सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहतूक आज सोलापूर शहर व जिल्ह्यात ठप्प होती. रस्त्यावर उतरत टायर जाळून आंदोलनकर्त्यांनी सरकारचा जाहीर निषेध केला. 

मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून सोलापूर शहर व परिसरात विविध पद्धतीची आंदोलने होत आहेत. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आपला रोष व्यक्त केला. नरसय्या आडम, माउली पवार, प्रताप चव्हाण यांच्यासह मराठा आंदोलनाच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सायंकाळच्या सुमारास या नेत्यांची सुटका करण्यात आली. पद्मशाली, लिंगायत, धनगर, दलित, मुस्लिम आणि मराठा अशी संमिश्र लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहरात आज सर्वांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे कडकडीत बंद झाला. 

ठळक घडामोडी
सोलापूर शहरातील विडी उद्योगही बंद
रेल्वेने आलेल्यांची पायपीट
जेल भरो व महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय 
शाळा, महाविद्यालयांना सुटी
करमाळ्यात तिरडी मोर्चा
अक्कलकोटमध्ये बंद व मोर्चा
सांगोल्यात तहसीलचे गेट बंद

Web Title: solapur band Maratha Kranti Morcha