मराठी शिक्षकांचे सोलापूरात कृतिसत्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

मुंबई - महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे यंदाचे 36 वे वार्षिक राज्यस्तरीय कृतिसत्र 10 व 11 डिसेंबरला सोलापुरात होणार आहे. यामध्ये राज्य सरकारच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी मराठी विषय शिक्षकांकडून शोधनिबंधाचे सादरीकरण केले जाणार. या वेळी मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील मराठी विषयाचे शिक्षक उपस्थित राहणार आहेत; अशी माहिती मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी दिली.

सोलापुरातील रा. स. चांडक हायस्कूलच्या प्रांगणात दोन दिवस हे कृतिसत्र चालणार आहे. यामध्ये इयत्ता सहावीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील "वाचा' या मथळ्याखाली येणाऱ्या उताऱ्यांचा अध्ययन व अध्यापनासाठी होणारा उपयोग. इयत्ता 10 वीच्या मराठी प्रथम भाषा कृतिपत्रिकेतील "निबंधलेखनाच्या बदललेल्या स्वरूपामुळे व कमी केलेल्या गुणांमुळे विद्यार्थ्यांचा निबंध लेखनाचा आनंद हरवेल का?', आनंददायी अध्ययन व अध्यापनासाठी इयत्ता सातवीसाठी पुढील वर्षी बदलणाऱ्या "मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील घटक व पाठ कसे असावेत' व इयत्ता 10 वीच्या मराठी प्रथम भाषा कृतिपत्रिकेतील "विचारविस्तार हा घटक विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती विकास करणारा आहे, त्याचे परिणामकारक अध्यापन कसे करता येईल,' या चार शोधनिबंधाचे सादरीकरण केले जाणार आहे.