अंबाबाईची दशभूजा महाकाली रुपातील पुजा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी करवीर निवासीनी अंबाबाईची दशभूजा महाकाली रुपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्रीपूजक माधव मुनीश्वर, मकरंद मुनीश्वर आणि रवी माईनकर यांनी ही पूजा बांधली.

दशभुजा महाकालीची थोडक्‍यात माहिती 
दुर्गासप्तशतीमधील प्रथम चरित्राची नायिका. विष्णु आणि मधु-कैदभ कथेमध्ये या महाकालीचा आविर्भाव. काजळाप्रमाणे काळी, दशवक्‍त्र, दशभुजा आणि दशपाद अशी ही महाकाली. हीच कथा देवी भागवत ग्रंथामध्ये विस्तृत स्वरूपात येऊन जाते. प्रथम चरित्रातील कथेप्रमाणे मधु आणि कैटभ निर्माण झाल्यावर ब्रह्माने काळरात्रीचे अर्थात मोहनिद्रेचे स्तवन केले आणि विष्णुला जागे करण्याबद्दल विनंती केली. देवीच्या दहा हातामध्ये - खड्‌ग, चक्र, गदा, बाण, धनुष्य, परिघ, शूल, भुशूंडी, असुराचे छिन्नमस्तक, शंख अशी आयुधे आहेत. देवीने विष्णुच्या शरीरापासून वेगळे होऊन त्याला जागे केले आणि मधुकैटभांचा नाश करविला.  

टॅग्स