‘शिवप्रतिष्ठान’च्या दुर्गामाता दौडीस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

सांगली - येथील ‘शिवप्रतिष्ठान’तर्फे नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित दुर्गामाता दौडीस उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सांगली - येथील ‘शिवप्रतिष्ठान’तर्फे नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित दुर्गामाता दौडीस उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी ध्वजवंदनानंतर ध्येयमंत्र म्हटल्यानंतर दुर्गामाता दौडीस सुरुवात झाली. आमदार सुधीर गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. संभाजीराव भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली दौड निघाली. ‘जय भवानी - जय शिवाजी’, ‘भारत माता की जय’, ‘जय जिजाऊ - जय शिवराय’ अशा जोरदार घोषणा देत महापालिका, राजवाडा चौक, पटेल चौक, आमराई चौक, कॉलेज कॉर्नर ते दुर्गामाता मंदिरासमोर दौड आली. देवीची आरती व पूजा झाली. श्री. भिडे यांच्या मार्गदर्शनानंतर दौड टिंबर एरिया, कॉलेज कॉर्नर, आमराई चौक, पटेल चौक, राजवाडा मार्गे पुन्हा मारुती चौकात आली. त्यानंतर समारोप झाला. दौडीच्या मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केले. नितीन चौगुले, मिलिंद तानवडे, अनिल तानवडे आदी उपस्थित होते.