विश्वास नांगरे पाटील आळंदी ते पंढरपूर करणार 'सायकल वारी'

Vishwas Nangare Patil
Vishwas Nangare Patil

कोल्हापूर - टाळ-मृदुंगाचा जयघोष, विठू नामाचा गजर आणि महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीत यावर्षी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांची 'सायकल वारी' सहभागी होत आहे. शत्तकोत्तर परंपरा असलेल्या या वारीत आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नसताना बंदोबस्त व सुविधा पाहणीच्या नावाखाली काढण्यात येणारी ही 'सायकल वारी' मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. 

नांगरे-पाटील यांच्यासह 200 तरूण या वारीत सहभागी होणार आहेत. आळंदी ते पंढरपूर अशी सहा दिवसाची ही वारी असेल. वारकऱ्यांची वारी पोहचण्यापूर्वी ही वारी मुक्कामाच्या ठिकाणी पोहचून तेथील सोयी सुविधांची पाहणी करणार आहे. या वारीत त्या त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, उपअधीक्षकांसह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. यानिमित्ताने एखाद्या यंत्रणेला वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. मुळात या वारीत कुणाचा खिसा कापला, दागिने हरवले असा प्रकारही कधी ऐकलेला नाही. पण पोलिसांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त करायचा का या सायकल वारीची बडदास्त करायची असा दुहेरी प्रश्‍न पडला आहे. 

पंढरपूरच्या या वारीत दरवर्षी दहा लाखाहून अधिक वारकरी सहभागी होतात. यावर्षी 16 व 17 जूनला वारकऱ्यांच्या दिंड्या प्रस्थान करणार आहेत. दिंड्यांच्या मुक्कामाची व इतर सुविधांची ठिकाणे ठरलेली आहेत. वर्षानुवर्षे त्यात कोणताही बदल नाही की खंड नाही. सर्व काही अलबेल असताना या सायकल वारीच्या निमित्ताने अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. देहू ते पंढरपूर या मार्गावर ही सायकल वारी असेल. सकाळी व सायंकाळी अशा दोन टप्प्यात दररोज 70 किलोमीटरचा प्रवास हे उद्दीष्ट आहे. सायकल वारीत मार्गावरील तरूणांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. 

सीसीटीव्ही बसवणार 
वारीच्या मार्गावर दिंड्यांचा मुक्काम ज्या गावांत किंवा मैदानावर असेल त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहेत. मार्गावरील काही नगरपालिकांनी याची जबाबदारी घेतली आहे. सायकल वारीत पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सहभागी होतील. त्यामुळे मूळ दिंडीपेक्षा या सायकल वारीच्या बडदास्तीसाठी यंत्रणेला झटावे लागणार आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मुख्यमंत्री येईपर्यंत जाळू नका; शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या
तिडके, डोईफोडेचे अपराध अन् निशब्द पंकजा
म्यानमारच्या विमानाचे अंदमानमध्ये सापडले अवशेष; सर्व प्रवाशांचा मृत्यू
मंदसोरच्या जिल्हाधिकारी, एसपींची बदली; राहुल गांधी शेतकऱ्यांच्या भेटीला
धुळे: कर्जमाफीसाठी शिवसेनेचे 'जलसमाधी' आंदोलन
पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय​
#स्पर्धापरीक्षा - बुद्धिबळ : कार्लसनची जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक​
शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार आंदोलनावरून काँग्रेस, माकपचे टीकास्त्र​
जनावरे खरेदी-विक्री निर्बंधास सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com