व्हॅनच्या अपघातात अकरा पोलिस जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नेवासे - नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात पोलिस व्हॅनचा अपघात झाला. या अपघातात 11 पोलिस जखमी झाल्याचे समजते. 

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर कंटेनरला पोलिसांची व्हॅन धडकली. माळीचिंचोरे गावाजवळ ही दुर्घटना घडली. या व्हॅनमध्ये एकूण 17 पोलिस कर्मचारी होते. अहमदनगर येथे बंदोबस्तासाठी जळगावमधून पोलिस आले होते. दरम्यान, जखमी पोलिसांना नेवासे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: 11 policemen injured in van crash