बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा उगाच वेड्यासारखा वागतोय - डॉ. दा. वि. नेने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

सांगली : बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उगाच कुणाच्या तरी नादाला लागून वेड्यासारखा वागतोय, अशी टीका स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. दा. वि. नेते तथा दादूमियॉं यांनी आज केली. येथील स्वा. सावरकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. 

विश्रामबागमधील स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या प्रांगणात सकाळी संमेलनाचे उद्घाटन झाले. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, देशात मोदींचे सरकार हे सावरकरांच्या विचारांचे पहिलेच सरकार आहे. नेहरूंपासून शरद पवारांपर्यंत सर्व नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी हिंदुत्वाची गळचेपी केली. भाजप चांगले काम करत असताना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे थेट नाव न घेता "बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा' असा उल्लेख करत तो वेड्यासारखा वागतोय, अशी टीका केली. ठाकरे सत्तेत राहून भाजपविरोधी भूमिका घेत असल्याच्या मुद्याकडे त्यांचा रोख होता. ते म्हणाले, "आता सत्ता भाजपची आहे. त्यामुळे सत्तेवर त्यांचे वर्चस्व रहाणे सहाजिक आहे. ज्याच्या हाती दोरी तो मालक, ही रीतच आहे. त्यामुळे उगाच असे वेड्यासारखे वागून चालणार नाही. लोकांना सारे माहिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते योग्य ठिकाणी मतदान करतील.''