राज्य पुरस्कारासाठी 1164 गुरुजींचे अर्ज; ऑनलाइन अर्ज करण्यात मुंबई, पुणेच्या गुरुजींची बाजी 

1164 Teachers application for State award
1164 Teachers application for State award

सोलापूर : शासनाच्यावतीने दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्कार दिले जातात. 2017-18 या आर्थिक वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा, यासाठी राज्यातील एक हजार 164 गुरुजींनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. अर्ज दाखल करण्यात प्राथमिक विभागात मुंबईने तर माध्यमिक विभागात पुणे जिल्ह्यातील गुरुजींनी बाजी मारली आहे. 

शिक्षण हा समाजाच्या विकासाचा पाया आहे. स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या गुरुजींमुळेच राज्याचा, देशाचा व पर्यायाने समाजाचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या गुरुजींना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. यापूर्वी हे पुरस्कार देण्यासाठी लेखी स्वरूपात अर्ज करावे लागत होते. मात्र, त्यामध्ये वशिलेबाजी होत असल्याचे शिक्षण विभागाच्या ध्यानात आल्यानंतर मागील एक-दोन वर्षापासून गुरुजींनी पुरस्कारासाठी कुणाच्याही मागे न लागता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा निर्णय झाला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बशिलेबाजीला चाप लागला आहे. ज्या गुरुजींनी खरोखरच विद्यार्थ्यांसाठी, राष्ट्रासाठी व समाजासाठी चांगले काम केले आहे, त्यांचीच निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी केली जाते. प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागासाठी हे पुरस्कार दिले जातात. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातून गुरुजींनी अर्ज केले आहेत. 

गुरुजींनी केलेल्या अर्जाची स्थिती -
प्राथमिक विभागासाठी 571, माध्यमिक विभागासाठी 490 तर सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कारासाठी 103 गुरुजींनी अर्ज केले आहेत. प्राथमिक विभागासाठी मुंबई येथून सर्वाधिक 33 गुरुजींनी तर सर्वांत कमी तीन अर्ज गडचिरोलीतून आले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागासाठी पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 43 गुरुजींनी अर्ज केले आहेत. यासाठी पालघर जिल्ह्यातून एकाही गुरुजींनी अर्ज केला नाही. 
 
आजपासून मुलाखती -
ज्या गुरुजींनी पुरस्कारासाठी अर्ज केला आहे, त्यांच्या मुलाखती उद्यापासून (बुधवार) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे याठिकाणी होणार आहेत. विभागनिहाय या मुलाखती नऊ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. त्यात पुरस्कारासाठी पात्र गुरुजींची निवड होणार आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com