कृष्णा नदीमध्ये 12 फुट लांबीची मगर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

रेठरे बुद्रुक (सातारा) - येथील कृष्णा नदीमध्ये मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे रेठरेसह जवळच्या रेठरे खुर्दगावातील ग्रामस्थाना सुचित करण्यात आले आहे. कृष्णा नदीमध्ये 10 ते 12 फुट लांबीची मगरीचे दर्शन झाले असल्याने नदीच्या पाणवठ्यांवर आंधोळ करण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी व गुरे धुण्यासाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. 

याबाबत वनविभाग कऱ्हाडचे श्री.गवते यांनी पाहणी केली असून, दोन्ही गावच्या ग्रामस्थानी दक्षता घ्यावी. तसेच अफवा पसरवू नये, अशा सूचना दिल्या आहेत. 

Web Title: 12 Feet long crocodile krushna river

टॅग्स