हुमणी बाधीत क्षेत्राच्या पंचनाम्यासाठी 187 कर्मचाऱ्यांची नेमणुक

हुमणी बाधीत क्षेत्राच्या पंचनाम्यासाठी 187 कर्मचाऱ्यांची नेमणुक

मोहोळ- उशीरा का होईना मोहोळ तालुक्यातील आठ महसुली मंडलातील हुमणी बाधीत क्षेत्राच्या पंचनाम्यासाठी महसुल, कृषी व पंचायत समिती विभागातील 187 कर्मचाऱ्यांची नेमणुक केली असून, तसे लेखी आदेश त्यांना देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात पंचनाम्यासाठी येत्या बुधवारपासुन आरंभ करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.

गेल्या तीन  महिन्या पासुन पाऊस नसल्याने व जमिनीत पुरेशी ओल नसल्याने हुमणी ने धुमाकुळ घातला आहे. तालुक्यात तीन साखर कारखाने असल्याने ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात विस्तारले आहे . मात्र, चालु वर्षी कधी नाही ऐवढे हुमणीने ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे ऊसाबरोबरच हुमणी ने मका कांदा या पिकांचेही मोठे नुकसान केले आहे. पाऊस नाही, भाजीपाल्याला भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांच अर्थिक गणित कोलमडले आहे .एकमेव नगदी पिक म्हणुन ऊसाकडे पाहीले जाते, मात्र त्याची अशी अवस्था झाल्याने दैनिक सकाळने याबाबत सविस्तर वृत प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने चर्चासत्राचे आयोजन केले होते, तर टाकळी सिकंदर येथील भीमा कारखान्याने मांजरी येथील व्हीएसआय या संस्थेच्या शास्त्रज्ञांना पाचारण केले होते.

दरम्यान, वृताची दखल प्रशासनानेही घेत उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना बाधीत क्षेत्राच्या पंचनाम्याचे आदेश दिले. कृषी विभागाने गावनिहाय बाघीत क्षेत्राचा अहवाल तहसीलदार यांना सादर केला. तहसीलदार बनसोडे यांनी मोहोळ, पेनूर, वाघोली, नरखेड, शेटफळ, सावळेश्वर, कामती, टाकळी सिकंदर या आठ मंडलातील बाधीत क्षेत्राच्या पंचनाम्यासाठी 187 कर्मचाऱ्यांची नेमणुक केली आहे त्यात त्या त्या गावचे तलाठी ग्रामसेवक व कृषी सहायक यांचा समावेश आहे. या आठ मंडलाधिकाऱ्यांचे नियंत्रण कर्मचारी पथकावर राहणार असुन, तालुकास्तरावर समन्वय़क म्हणून नायब तहसीलदार किशोर बडवे हे काम पाहणार आहेत. मात्र ऐवढा आटापिटा करून शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार का हा प्रश्न विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com