सातारा - ट्रॅक्टर दरीत कोसळून दोघांचा मृत्यू

यशवंत बेंद्रे 
गुरुवार, 7 जून 2018

तारळे (सातारा) : कोंजवडे बेंदवाडी घाट रस्त्यात भुडकेवाडी गावच्या हद्दीत आज मध्यरात्री 11 ते 12च्या दरम्यान सवारवाडी येथे शेणखत भरण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर ट्रॉली चालकाने बेदरकार वाहन चालविल्याने 100 ते 200 फूट खोल दरीत कोसळला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

विलास कराडे (वय 25) व इराप्पा खरात (वय 26, दोघेही रा. चिकुंडी करेवाडी ता. जत जि. सांगली) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. दरीत काही तरी पडल्याच्या आवाजाने डोगंराच्या खालच्या गावातील भुडकेवाडी, माळवाडी आणि कडवे या गावामधील तरूण युवकांनी धाव घेऊन मदतकार्य चालू केले. परंतु, दरी अवघड असल्यामुळे तसेच पावसाची भुरभुर असल्याने मदत कार्यात भरपूर अडथळे येत होते.  

रात्री 1 वाजल्या पासून मृतदेह वरती काढण्याचा प्रयत्न सुरू होता अखेर 4 वाजता मृतदेह बाहेर  कढण्यास यश आले. कराड येथे उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आले. या मदतीसाठी तीन्ही गावातील 50 ते 60 युवकांनी सहकार्य केले तसेच तारळे पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी ही रात्रभर मदत कार्यात आघाडीवर होते.

Web Title: 2 died in accident of tractor