शहरातील 22 नागरिकांचे स्थलांतर 

शहरातील 22 नागरिकांचे स्थलांतर 

कोल्हापूर - मुसळधार पावसाने पंचगंगा पातळीत सातत्याने वाढ होत आहे. राजाराम बंधारा येथे नदीची पातळी धोक्‍याजवळ पोचली असल्याने शहरातील सखल भागात पुराचे पाणी येत आहे. 

सुतारमळा या परिसरात पुराचे पाणी आल्याने तेथील एकूण पाच कुटुंबातील 22 नागरिकांना दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच, पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने उर्वरित नागरिकांनाही स्थलांतरित होण्याबाबत सूचना केलेली आहे. तसेच, वैद्यकीय पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. 

आज गांधी मैदान, विभागीय कार्यालय क्रमांक एककडील जवाहरनगर, शालिमार लॉन मंगल कार्यालयाजवळील व संभाजीनगर येथील घराची भिंत पडलेली होती. त्याठिकाणचा खरमाती उठाव करण्यात आलेला आहे. ज्योतिर्लिंग कॉलनी येथे झाडाचे बुंधे आरसीसी पाईपमध्ये अडकले होते, ते काढण्यात आले. छत्रपती शिवाजी मार्केट, विभागीय कार्यालय क्रमांक दोनकडील बाराईमाम येथील व पापाची तिकटी येथील जुनी इमारत धोकादायक असल्याने ती उतरवून घेण्यात आली. शिवाजी पूल परिसरातील रस्त्यावर खड्डे पडल्याने ते पॅचवर्क करण्यात आले. 

आपत्कालीन स्थितीच्या मुकाबल्यासाठी महापालिकेच्या इमारतीतील अग्निशमन विभागाकडे मुख्य आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 101 असा आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या आपत्ती काळातील तक्रारीसंदर्भात दूरध्वनी क्रमांक 2540290 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत चार विभागीय कार्यालयांत दक्षता पथके 24 तास कार्यरत ठेवण्यात आलेली आहेत. 

नागाळा पार्कमध्ये झाड हटविले 
अतिवृष्टीमुळे सुवर्णा साडी सेंटर महापालिका सिग्नलजवळ इमारतीवरील कायमस्वरूपी लावलेला बोर्डचा पत्रा धोकादायकरीत्या लटकला होता. हा पत्रा फायर फायटर पाठवून काढण्यात आला. नागाळा पार्क येथे व शिवाजी पार्क येथे झाड पडले होते. झाड काढून रस्ता रिकामा करून देण्यात आला. कसबा बावडा ते शिये रस्त्यावर पाणी आले होते. रस्ता बंद करण्यात आला आहे. पिनड्रेला अपार्टमेंट नागाळा पार्क येथे बेसमेंटमध्ये पाणी शिरले होते, ते मोटारीद्वारे काढण्यात आले. 

आपत्कालीन व्यवस्था 
कोल्हापूर महापालिका विभागीय कार्यालयातील दक्षता विभागास पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ः गांधी मैदान, विभागीय कार्यालय क्रमांक एक- 2622262 व 2620270, शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय क्रमांक दोन- 2543844 व 2543088, राजारामपुरी विभागीय कार्यालय क्रमांक तीन- 2521615 व 2530012, ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय क्रमांक चार- 2536726 व 2530011. महापालिकेतर्फे हे आवाहन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com