सहकारी दूध संघांच्या याचिकेवर 25 ला सुनावणी 

सहकारी दूध संघांच्या याचिकेवर 25 ला सुनावणी 

सोलापूर - शासनाच्या आदेशानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना 27 रुपयांऐवजी कमी दर दिल्याने बहुतांशी सहकारी दूध संघांना सरकारने नोटीस बजावली आहे. त्या विरोधात पुणे, औरंगाबाद, नगर व नाशिक विभागांतील आठ सहकारी संघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर 25 जून रोजी सुनावणी होणार आहे. 

शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना 3-5, 8-5 फॅट असलेल्या दुधाला 27 रुपयांचा दर देणे बंधनकारक असूनही राज्यातील 17 पैकी बहुतांशी सहकारी दूध संघाकडून 17 ते 19 रुपयांचा दर दिला जात आहे. त्यामुळे अशा दूध संघांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणारे संघ बरखास्त करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. परंतु, शासनानेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना इतर राज्याच्या धर्तीवर थेट अनुदान द्यावे, सहकारी दूध संघांकडील अतिरिक्‍त दूध हमीभावाने खरेदी करावे, शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश करावा, अशा मागण्या या दूध संघांकडून करण्यात येत आहेत. याबाबत सहकारी दूध संघ आता 25 जूनला उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. 

पुणे विभागातील गोकूळ, कात्रज आणि बारामती तालुका दूध संघ, औरंगाबाद विभागातील बीड व औरंगाबाद जिल्हा दूध संघ तसेच, नाशिकमधील संगमनेर, राजहंस तर नगर दूध संघांनी शासनाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार अन्य दूध संघांनाही तो निर्णय लागू करण्यात येईल. 
- सुनील शिरापूरकर, उपनिबंधक, दुग्ध विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com