मिरजेत डॉल्बीचे २५ लाखांचे साहित्य जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

मिरज - शहरातील भानू तालीम परिसरातील गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीतील लावलेले डॉल्बीचे पंचवीस लाखांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. डॉल्बीबाबतच्या न्यायालयीन आदेशाबाबत पोलिसांनी वांरवांर सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंडळ आणि डॉल्बीमालकावर पोलिसांनी ही कारवाई केली. ही कारवाई टाळण्यासाठी शहरातील बरेच राजकीय आणि तथाकथीत सामाजिक कार्यकर्ते शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत थांबून होते. तरीही पोलिसांनी हा दबाव झुगारून डॉल्बीचे सर्व महागडे साहित्य आणि ट्रॅक्‍टर, ट्रॉली जप्त केले. 

गणेशोत्सवापूर्वीपासूनच पोलिस यत्रंणा डॉल्बी मुक्त गणेशउत्सवासाठी धडपडत होती. याबाबतचा न्यायालयीन आदेश, डॉल्बीचे दुष्परिणाम याची माहिती देण्यासाठी पोलिस यत्रंणेने गेल्या काही महिन्यांपासून स्वतंत्र यत्रंणाच राबवली. सांगली जिल्ह्यासह मिरजेतीलही अनेक मंडळानी पोलिसांच्या या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला. पण शहरातील ब्राह्मणपुरीतील भानू तालीम परिसरातील एका मंडळाने मात्र काल डॉल्बीच्या दणदणाटातच मिरवणूक सुरू केली. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी गोरे वाड्यानजीक ही मिरवणूक अडवली. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी स्वतः पुढाकार घेऊन डॉल्बी बंद करण्यास भाग पाडले आणि त्यानतंर जाग्यावरच डॉल्बीसाठीचे परदेशी बनावटीची तीन यंत्रे, एक रोटर, दोन मोठे बॉक्‍स, जनरेटर, असे तब्बल पंचवीस लाख रुपयांचे साहित्य जप्त केले. 

नेत्यांची गोची... 

कारवाईनतंर शहरातील वजनदार राजकीय मडंळीनी पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांची मनधरणी करून पाहिले आणि त्यानतंर दबावही टाकण्याचा प्रयत्न केला पण पोलिस यत्रंणा कारवाईशी ठाम राहिली. पोलिसांच्या या ठाम भूमिकेमुळे याच राजकीय आणि तथाकथीत सामाजिक कार्यकर्त्यांचे पोलिसांकडील खरा वट सामान्य कार्यकर्त्यांना समजल्याने या नेतेमंडळीची बरीच गोची झाली.

Web Title: 25 lakh seized materials Miraj dolbice