जलवाहिनीला गळतीमुळे 40 फूट उंचीचे कारंजे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

सातारा - नगरपालिका मुख्यालय इमारतीसमोरील पाण्याच्या व्हॉल्व्हला अज्ञात वाहनाचा दणका बसल्याने आज दुपारी नागरिकांना भले मोठे कारंजे अनुभवायला मिळाले. सुमारे 40 फूट उंचीपर्यंत हे कारंजे उडत होते. नागरिकांनी हे भव्य कारंजे पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. सुमारे अर्धा तपास हे कारंजे उडत होते. पालिका कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने पाणी बंद करून ही जलवाहिनी रिकामी करण्यात आली. त्यानंतर जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली. रस्त्याकडेच्या विजेच्या खांबाच्या दुप्पट उंची म्हणजे सुमारे 40 फूट उंचीवर उडणारे कारंजे पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. 

या घटनेसंदर्भात पालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ""नगरपालिका इमारतीला पाणी पुरविण्यासाठी घोरपडे साठवण टाकीतून एक दोन इंची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह आहे. त्याला वाहनाचा धक्का लागला असावा.''