चारशे महिला स्वावलंबनाकडे

सचिन शिंदे
बुधवार, 25 एप्रिल 2018

कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असलेल्या १५ गावांतील चारशेपेक्षा जास्त महिला स्वावलंबी झाल्या आहेत. दुर्गम डोंगराळ गावातील महिलांत गीता परळकर व व्याघ्र प्रकल्प उपसंचालक विनिता व्यास यांनी प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांत ही किमया घडवली आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांतील महिलांना कागदी व कापडी पिशव्यांच्या प्रशिक्षणाचा उपक्रम येथे यशस्वीपणे राबवला आहे. १५ गावांतील सुमारे ४०० महिला त्यात प्रशिक्षित झाल्या. प्लॅस्टिक बंदीमुळे त्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

साताऱ्याच्या सौ. परळकर यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ४०० पिशव्या तयार करता येतात. पिशव्या तयार करण्यासाठी आवश्‍यक असलेला साचा वन विभागाने सौ. व्यास यांच्या कल्पनेतून तयार केला. त्याचे मशिन तयार करण्यात आले आहे. हे मशिन व्याघ्र प्रकल्पाच्या मोठ्या गावांतील समाजमंदिरात नेण्यात येते. तेथे चार दिवसांचा कोर्स शिकवला जातो. हे प्रशिक्षण त्या भागातील महिलांच्या उपजीविकेचे साधन बनले आहे. व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील सर्व गावांत हा प्रयोग राबण्याचा निर्धार व्यास यांनी केला आहे.

व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील ४०० पेक्षा जास्त महिला प्रशिक्षित झाल्यात. आता तेथील पुरुषही या प्रशिक्षणाकडे वळू लागले आहेत. या पिशव्यांना चांगली मागणी आहे. 
- गीता परळकर, प्रशिक्षक 

...ही गावे झाली प्रशिक्षित!
व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील आंबवडे, अकलपे, उचाट, निवडी, तिवडी, लामज, पिंपरी, रासाटी, सातर, निगडे, उंबरवाडी, मुनावळे, शेंबडी, शिंधी, मोरणी, कांदट ही गावे कागदी व कापडी पिशव्यांत स्वावलंबी झाली आहेत. 

Web Title: 400 women cloth bag self sufficiency