चार हजारांवर विद्यार्थ्यांनी दिली प्रवेश परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

सातारा - शिवाजी विद्यापीठातर्फे झालेल्या १८ विषयांसाठी चार हजार ७८९ विद्यार्थ्यांनी ऑफ लाइन पद्धतीने आज प्रवेश परीक्षा दिली. रसायनशास्त्र विषयासाठी तीन  हजार ४१८ इतका विद्यार्थ्यांचा उच्चांकी आकडा राहिला. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामधील केंद्रांवर परीक्षा झाली. 

सातारा - शिवाजी विद्यापीठातर्फे झालेल्या १८ विषयांसाठी चार हजार ७८९ विद्यार्थ्यांनी ऑफ लाइन पद्धतीने आज प्रवेश परीक्षा दिली. रसायनशास्त्र विषयासाठी तीन  हजार ४१८ इतका विद्यार्थ्यांचा उच्चांकी आकडा राहिला. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामधील केंद्रांवर परीक्षा झाली. 

विद्यापीठातील मानव्यशास्त्र इमारत, ग्रंथालय व रसायनशास्त्र अधिविभाग, सायबर, सांगलीतील कस्तुरबाई वालचंद, साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कऱ्हाडमधील सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालय ही परीक्षा केंद्रे होती. येथे सकाळपासूनच विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी गर्दी होती. एकूण ३४ अभ्यासक्रमांसाठी ऑफ लाइन पद्धतीने प्रवेश परीक्षा होत असून, पैकी १८ विषयांची आज झाली. त्यासाठी एकूण पाच हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात चार हजार ७८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. रसायनशास्त्र विषयासाठी एकूण तीन हजार ७३६ विद्यार्थ्यांची नोंद होती. त्यातील तीन हजार ४१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली. 

विषयनिहाय परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 

- एमए; एमएस्सी जिऑग्राफी - ४३५ - एमए मास कम्युनिकेशन - ४७ 
- केमिस्ट्री - ३४१८ - बीजेसी - १४७ - एमजेसी - १७ 
- ॲग्रोकेमिकल्स ॲण्ड पेस्ट मॅनेजमेंट- १८३ - एमए (इंग्रजी)- ५८ 
- एमए (अर्थशास्त्र)- ७८ - (इतिहास) - ५८ - (हिंदी) - ११ 
- (मराठी) - १२३ - (तत्त्वज्ञान) - ७ - (मानसशास्त्र)- १३ 
- (राज्यशास्त्र) - १३१ - (पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन) - ६ 
- (संस्कृत) - ६ - (समाजशास्त्र) - ५१ - (उर्दू) - ० 

प्रक्रिया ऑफलाइन; रसायनशास्त्रासाठी सर्वाधिक तीन हजार ४१८ विद्यार्थ्यांचा सहभाग