कऱ्हाडच्या व्यापाऱ्याकडील जप्त नोटा 46 लाखांच्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

सांगली - येथील वसंतदादा औद्योगिक वसाहतीमध्ये पोलिसांनी मोटारीतून जप्त केलेल्या जुन्या नोटांची तब्बल तीन तास मोजदाद केल्यानंतर 46 लाख 45 हजार 500 रुपये असल्याचे स्पष्ट झाले. कापड व्यापारी कुमारपाल संघवी (कऱ्हाड, जि. सातारा) व सराफ किशोर लुनिया (कोंडवा, पुणे) यांची पहाटे साडेतीनपर्यंत चौकशी करून सोडून दिले. दोघे नोटा बदलण्यासाठी सांगलीत आले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. प्राप्तिकर विभागाला संजयनगर पोलिसांनी नोटांबाबत माहिती कळवली आहे.

औद्योगिक वसाहतीत संजयनगर पोलिसांनी काल रात्री नऊ वाजता मोटार (एमएच 11 एडब्ल्यू 3784) अडवून झडती घेतल्यानंतर चलनातून बाद झालेल्या नोटांनी भरलेली "सॅक' मिळाली. मोटारीत व्यापारी संघवी व सराफ लुनिया आणि त्यांचे कुटुंबीय होते. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संघवी यांनी मुलीच्या "ट्रिटमेंट'साठी डॉ. सुधाकर जाधव यांच्याकडे आल्याचे सांगितले, तर नोटांबाबत विचारणा केल्यानंतर "आरबीआय'कडे भरणा करणार होतो, एवढेच उत्तर दिले.
नोटा मोजण्याचे मशिन आणून पोलिसांनी मोजदाद सुरू केली. त्यात तब्बल 46 लाख 45 हजार 500 इतकी रक्कम असल्याचे स्पष्ट झाले. पाचशे व हजारांच्या चलनातील बाद झालेल्या नोटांमध्ये ही रक्कम विभागली आहे.

पहाटे साडेतीनपर्यंत पोलिसांची तपासणी पूर्ण झाली. त्यानंतर संघवी, लुनिया यांच्या कऱ्हाड येथील नातेवाइकांना बोलावून घेतले. नातेवाइकांचा जबाब घेऊन दोघांना कुटुंबीयाच्या ताब्यात दिले. निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी प्राप्तिकर विभागाला कळवले आहे. पुढील तपास प्राप्तिकर विभागाच करणार असल्याचे सांगितले.

नोटा बदलीचा संशय...
मुलीच्या "ट्रिटमेंट'साठी सांगलीत आल्याचे संघवी, लुनिया यांनी सांगितले, तर रक्कम "आरबीआय'कडे नेणार असल्याचे सांगितले; परंतु सांगली परिसरात कोणाकडे तरी नोटा बदलून घेण्यासाठी ते आले असावेत, असा पोलिसांचा संशय आहे; कारण नोटाबंदीनंतर बदली करून देणारे काही एजंट तयार झाले होते. सांगलीतील ही तिसरी तर जिल्ह्यातील सातवी कारवाई आहे.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : गेली काही वर्षे रेंगाळलेल्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर...

03.21 PM

कऱ्हाड : शहरातील विविध ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली. पालिकेचे चार अधिकारी व पन्नास कर्मचारी त्यात सहभागी...

01.00 PM

श्रीगोंदे, (जिल्हा नगर) : क्रूरकर्मा नराधमाने पाच वर्षांचा कोवळ्या जीवाच्या शरीराची विटंबना केली. एकदा नव्हे अनेकदा तिच्यावर...

मंगळवार, 15 ऑगस्ट 2017