पवार यांचा ४७ गावांसाठी निधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

प्रभाकर घार्गे; माण, खटाव व कोरेगाव तालुक्‍यांतील गावांचा समावेश

खटाव - सातारा जिल्ह्यातील माण, खटाव व कोरेगाव तालुक्‍यांतील जलसंधारण कामांसाठी खासदार शरद पवार यांच्या स्थानिक विकास निधीतून एक कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ४७ गावांतील जलसंधारण कामांसाठी हा निधी देण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी दिली.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी माण तालुक्‍यातील बिदाल व किरकसाल येथे लोकसहभागातून सुरू असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी केली होती. त्यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी माण आणि खटाव तालुक्‍यांतील गावांसाठी खासदार विकास निधीची मागणी केली होती. त्यानंतर श्री. पवार यांनी या कार्यक्रमातच एक कोटींचा निधी जाहीर केला.

खटाव तालुक्‍यातील जाखणगाव, नागाचे कुमठे, जायगाव या गावांसाठी प्रत्येकी चार लाख, तर यलमरवाडी, भोसरे, रेवलकरवाडी, कातळगेवाडी, खातवळ, बोंबाळे, विखळे, लोणी, गादेवाडी, पांगरखेल, रणसिंगवाडी, डिस्कळ, पांढरवाडी, कळंबी, ललगुण, हिंगणे या गावांसाठी प्रत्येकी दोन लाख, तर राजापूरसाठी तीन लाखांचा निधी मिळणार आहे. माण तालुक्‍यातील परकंदी, कुळकजाई, मोगराळे, पिंपरी, पांगरी, इंजबाव, पर्यंती, खुटबाव, वाकी, मार्डी, राजवडी, शिरवली, अनभुलेवाडी, श्रीपालवण, शिंदी, गोंदवले खुर्द, दानवलेवाडी, जाशी, थदाळे, सोकासन, काळेवाडी, शेवरी, कारखेल या गावांना प्रत्येकी दोन लाखांचा, तर बिदाल आणि किरकसाल गावांना प्रत्येकी चार लाखांचा निधी मिळेल. कोरेगाव तालुक्‍यातील पवारवाडी व न्हावी बुद्रुक या गावांनाही प्रत्येकी दोन लाख मिळणार आहेत.

जलसंधारण कामे करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी शरद पवार यांनी एक कोटीचा निधी दिला आहे. ज्या गावांना निधी जाहीर झाला आहे, त्या गावच्या प्रोजेक्‍ट प्रमुखांनी तातडीने कामाचे अंदाजपत्रक द्यावे.
- प्रभाकर घार्गे, माजी आमदार