आणखी ५ कुपोषित सीपीआरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्‍यातील शित्तूर मलकापूर येथील आधार मतिमंद विद्यालयातील आणखी पाच अल्पवयीन कुपोषित विद्यार्थ्यांना रात्री उशिरा उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. उद्या, सोमवारी आणखी पंधरा विद्यार्थ्यांना उपचारासाठी येथे दाखल केले जाण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्‍यातील शित्तूर मलकापूर येथील आधार मतिमंद विद्यालयातील आणखी पाच अल्पवयीन कुपोषित विद्यार्थ्यांना रात्री उशिरा उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. उद्या, सोमवारी आणखी पंधरा विद्यार्थ्यांना उपचारासाठी येथे दाखल केले जाण्याची शक्‍यता आहे. 

अपुरा पोषण आहार, औषधोपचारांचा अभाव यांमुळे पाच जणांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना आज उपचारासाठी दाखल करण्यात आले. पूजा नायडू (वय १५), गोट्या (१६), पीके (८), संजना (१२), रेश्‍मा (वय ७) अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. उपचारांसाठी त्यांना आणले असता त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. त्यांच्यावर यापूर्वीच उपचार होणे आवश्‍यक होते; मात्र शाळाचालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्यावर साधा औषधोपचारही केलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍याच्या पातळीपर्यंत पोचला आहे. संस्थाचालकांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मरणासन्न अवस्थेत हे विद्यार्थी जगत होते. कोल्हापूरसारख्या सधन, समृद्ध व दातृत्वाची मोठी परंपरा असलेल्या जिल्ह्यात मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ यावी, हे दुर्दैव आहे. या शाळेवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही कुचकामी ठरली आहे.  

या शाळेतील तीन विद्यार्थ्यांना शनिवारी उपचारांसाठी दाखल केले होते. त्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. आज पुन्हा पाच विद्यार्थी दाखल केल्याने उपचारासाठी दाखल केलेल्यांची संख्या ७ झाली आहे. कुपोषित विद्यार्थ्यांचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. प्रकरण अंगावर शेकू नये साठी धावपळ केली जात आहे. या विद्यालयात एकूण ३७ विद्यार्थी असून, उद्या सोमवारी आणखी पंधरा जणांना उपचारांसाठी दाखल केले जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: 5 student malnourished in CPR hospital

टॅग्स