सातारा जिल्ह्यात ५०२ मद्यालयांना टाळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

‘राज्य उत्पादन’तर्फे दुकाने सील करण्याची प्रक्रिया सुरू 

सातारा - राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे वाढलेले प्रमाण हे मद्य पिऊन गाडी चालविल्यानेच होत असल्याचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या मार्गांवरील वाईन शॉप, बिअर शॉप, देशी किरकोळ विक्रेत्यांचे परवाने नूतनीकरण न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ५०२ दारू दुकानांना आजपासून टाळे लागले आहेत. दुकाने सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी रोखण्यासाठी या मार्गांच्या ५०० मीटर परिसरात असलेली सर्व दारू दुकाने व परमीट बार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व परिस्थितीचा सर्व्हे केला. यामध्ये ८० टक्के दुकाने, परमीट रूम, बिअरबार स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटर अंतरावरील दारूविक्रीचा आदेश स्पष्ट झाल्यामुळे आता केवळ वाईन शॉप, बिअर शॉप, देशी किरकोळ विक्रेत्यांना बंदी राहणार आहे. त्यांचे परवाने नूतनीकरण केले जाणार नाही. या आदेशानुसार जिल्ह्यातील ५०२ दुकाने सील केली जाणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील विक्रेते आदेशाची वाट पाहात होते. आता आदेश आल्यामुळे बहुतांशी दुकानदारांनी दुकान स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत; पण स्थलांतरणाबाबत कोणतेही आदेश अद्याप शासनाकडून आलेले नसल्याचे दारूबंदी अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांनी सांगितले.

सातारा शहरातील अनेक दुकानांना टाळे....
सातारा शहरातून राज्य महामार्ग जात असल्याने या मार्गावर येणारी सर्व दारू दुकाने, परमीटरूम, बिअर बार बंद झाले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या दुकानांच्या परवाने व इतर बाबतीत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.

बाधित दुकाने

देशी दारू विक्रेते 80

विदेशी दारू विक्रेते 422