पंचगंगा स्मशानभूमीसाठी 51 हजार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

कोल्हापूर - महापालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार सेवा जरुर मोफत आहे; पण महापालिकेच्या या सेवेत आपलेही योगदान रहावे, म्हणून सौ. कुसूम,अर्जून बोडके (वय 81) या दांपत्याने आज 51 हजार रुपयांची देणगी पंचगंगा स्मशानभूमीस दिली. मोफत सेवा जरुर द्यावी; पण आपली ऐपत असताना ती मोफत सेवा घेण्याऐवजी आपण थोडा हातभार लावला तर खऱ्या गरजूंना त्याचा लाभ मिळेल, अशा साध्या शब्दात त्यांनी देणगी देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. 

कोल्हापूर महापालिका 1972 पासून मोफत अंत्यसंस्कार सेवा देते. आज ज्याला देणगी द्यायची आहे, त्यांच्यासाठी स्मशानात देणगी पेटी ठेवली आहे; पण या देणगी पेटीत फार कमी लोक निधी टाकतात.ज्याची ऐपत आहे, असेही लोक आपल्या नातेवाईकांसाठी मोफत अंत्यसंस्काराचा लाभ घेतात. या पार्श्‍वभूमीवर बोडके दांपत्याने आज वेगळा आदर्श घालून दिला. त्यांनी सहायक आयुक्त संजय भोसले, संजय सरनाईक, आरोग्य निरिक्षक विजय पाटील, सहायक आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे, शिवाजी तरुण मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजित खराडे, शिवतेज खराडे यांच्या उपस्थितीत 51 हजारांचा निधी महापालिकेकडे दिला.

Web Title: 51 thousand for the Panchaganga graveyard