पेयजलच्या 63 योजनांना हवाय अकरा कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जून 2016

सांगली - राष्ट्रीय पेयजल योजनेचे नाव बदलून मुख्यमंत्री पेयजल योजना केली आहे. 63 गावांत पाणी योजनांचे काम सुरू आहे. 11 कोटी निधी मिळण्यास विलंब होत झाल्याने कामे रखडण्याची भीती आहे. प्रभारी अध्यक्ष रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची बैठक झाली. एप्रिल व मे महिन्यात वादळी वारा, पावसाने नुकसान झालेल्या केळींना भरपाई द्यावी, असा ठराव करण्यात आला.

सभापती भाऊसाहेब पाटील, बाबासाहेब मुळीक, सूर्यकांत मुठेकर, सुवर्णा पिंगळे, पपाली कचरे, सुवर्णा नांगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, छाटे पाटबंधारे विभागाचे हवेलीकर व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. ए. बारटक्के उपस्थित होते.

कोल्हापूर पद्धतीच्या पाच बंधाऱ्यांना मान्यता देण्यात आली. जतमध्ये 2, तासगाव, वाळवा व शिराळा तालुक्‍यातील एक बंधाऱ्यांचा समावेश आहे. 25 सिमेंट बंधाऱ्यात जत-11, आटपाडी-3, तासगाव-1, मिरज -1 आणि अन्य पाच तालुक्‍यांत दोन बंधारे आहेत.

एप्रिल-मे महिन्यात वादळाने 185 शेतकऱ्यांच्या केळी बागांचे नुकसान झाले. 67 हेक्‍टरचे पंचनामे करून मदत द्यावी, असा ठराव ऍड. मुळीक यांनी मांडला. जलयुक्त शिवारमधून 2015-16 मध्ये 141 गावांत 3 हजार 941 कामे पूर्ण झालीत. 349 कामे प्रगतिपथावर आहे. 52.50 कोटी खर्च झाला.

मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत 919 तळी मंजूर आहेत. 211 कामे सुरू, 190 पूर्ण आहेत. ठिबकसाठी दोन वर्षांसाठी 14.78 कोटी अनुदानाची मागणी केली आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी 13.49 कोटींची मागणी केली. टेंभूसाठी 2016-17 साठी 80 कोटी निधीची मागणी केली आहे.
 
"महाबीज‘च्या बियाणे
बियाणे प्रकार, मूळ किंमत, नवीन किंमत (रुपयांत)
मूग 2 किलो, 420, 270
मूग उत्कर्ष 5 किलो, 1000, 700
तूर 2 किलो, 450, 255
उडीद 5 किलो, 1150, 550
उडीद 2 किलो, 480, 240