जिल्ह्यात ६५ लाख क्विंटल साखर निर्मिती

- विकास जाधव
रविवार, 12 मार्च 2017

गळीत हंगामाची सांगता; १५ कारखान्यांत ५४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

काशीळ - जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. १५ कारखान्यांकडून ५४ लाख ३६ हजार ३०२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. त्यातून ६५ लाख १६ हजार ८१७ क्विंटल साखर निर्मिती झाली असून, सरासरी ११.९९ टक्के उतारा मिळाला आहे. या हंगामात जयवंत शुगर कारखान्याने प्रतिटनास सर्वाधिक दोन हजार ८५० रुपये दर दिला आहे.

जिल्ह्यातील नऊ सहकारी व सहा खासगी कारखान्यांनी ऊस गाळप झाले. जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात घट झाल्याने हा हंगाम मार्चच्या सुरवातीस संपला आहे. सह्याद्री कारखान्याने सर्वाधिक नऊ लाख ४२ हजार १९१ मेट्रिक टन इतके गाळप केले असून, १२ लाख १७ हजार ४७० क्विंटल साखर निर्मिती केली. साखर उताऱ्यात कृष्णा कारखान्याची आघाडी असून, या कारखान्याचा सरासरी उतारा १२.७० टक्के आला आहे. जयवंत शुगर या खासगी कारखान्याने सर्वाधिक दर दिला. या कारखान्याने प्रती टनास दोन हजार ८५० रुपये दिला आहे. जिल्ह्यात खासगी कारखान्यांच्या संख्येत वाढ झाल्याने या कारखान्यांकडून गाळपाचे प्रमाण वाढले आहे. सहा खासगी कारखान्यांनी १८ लाख ५७ हजार ३८४ मेट्रिक टन उसाचे गाळप करत २१ लाख ७५ हजार ७८१ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे, तसेच नऊ सहकारी कारखान्यांनी ३५ लाख ७८ हजार ९१८ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४३ लाख ४१ हजार ९० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.  

साडेचार महिने हंगाम 
जिल्ह्यातील नऊ सहकारी व सहा खासगी कारखान्यांचे गाळप नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले होते. वेगवेगळ्या कारणांनी जिल्ह्यात १४ हजार हेक्‍टर ऊस क्षेत्रात घट झाल्याने हा हंगाम अवघा चार ते साडेचार महिन्यांत  आटोपला आहे. उसाच्या क्षेत्रातील घट आणि साखरेचे वाढलेले दर यामुळे जास्तीतजास्त ऊस गाळप कसा करता येईल, याकडे सर्वच पान ४ वर 
 
यंदाच्या गळीत हंगामात...
सह्याद्री कारखान्याकडून सर्वाधिक गाळप
जयवंत शुगरचा सर्वांत अधिक दर
कृष्णा कारखाना साखर उताऱ्यात प्रथम
खासगी कारखान्यांकडूनही मोठ्या प्रमाणात गाळप
परजिल्ह्यातील कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस नेला.

Web Title: 65 lakh quintal sugar generation in satara district