नगर जिल्ह्यात 68 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

नगर - जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत आज जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक विभागाने व्यक्त केला. मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी तालुकानिहाय होणार आहे. दरम्यान, बनावट दारूमुळे सात जणांचा मृत्यू झालेल्या पांगरमल (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी आज मतदानावर बहिष्कार टाकला होता. गावातील मतदान केंद्रावर दिवसभर शुकशुकाट होता. 

जिल्ह्यातील 72 गट व 144 गणांमध्ये अनुक्रमे 305 व 541 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. जिल्ह्यात एक-दोन अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. दहा ठिकाणी मतदान यंत्रे बदलण्याची वेळ आली. मांडवगण व काष्टी (ता. श्रीगोंदे) येथील मतदान केंद्रे ताब्यात घेतल्याची अफवा सकाळी पसरली होती. 

पाथर्डी तालुक्‍यात कोल्हार येथील मतदान केंद्रावर पंचायत समिती सभापती मतदान करत असतानाच एका तरुणाने त्यांच्यासमोरील यंत्राचे बटन दाबून पळ काढला. पाठलाग करूनही तो सापडला नाही.

पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड : येथील कऱ्हाड, पाटण शिक्षक सोसायटीच्या इमारत नुतनीकरण, थकबाकी आणि शाखा विस्ताराच्या विषयावरून आज (सोमवार) झालेल्या...

10.33 AM

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात चांगला पाऊस झाला. चोवीस तासात नवजाला ३१ व महाबळेश्वरला २९ मिलीमीटर पाऊस...

09.48 AM

राजारामपुरीतील स्थिती - डॉक्‍टरांसह वाहनधारकांतून नाराजी, पोलिसांनी टाकली नांगी...

09.00 AM