चार वर्षाच्या चिमुरडीवर 75 वर्षीय वृद्धाचा बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

पीडित मुलीच्या वडिलांनी  दिलेल्या फिर्यादीवरून  श्रीगोंदे पोलिसांनी आरोपी  दादा भाऊ शेंडगे(पूर्ण नाव माहीत नाही) याच्या विरुद्ध  अट्रोसिटी, बाल लैंगिक अत्याचार कायदा व बलात्काराचा गुन्हा शनिवारी रात्री उशिरा दाखल केला.

श्रीगोंदे (नगर) : श्रीगोंदे शहरातील स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या चार वर्षीय चिमुरडीवर चॉकलेटचे अमिष दाखवून एका ७५ वर्षाच्या वृद्धाने अत्याचार केल्याची घटना घडली.

पीडित मुलीच्या वडिलांनी  दिलेल्या फिर्यादीवरून  श्रीगोंदे पोलिसांनी आरोपी  दादा भाऊ शेंडगे(पूर्ण नाव माहीत नाही) याच्या विरुद्ध  अट्रोसिटी, बाल लैंगिक अत्याचार कायदा व बलात्काराचा गुन्हा शनिवारी रात्री उशिरा दाखल केला.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, मूळचे  नगर तालुक्यातील असणारे एक कुटुंब शहरातील स्टेशन  रस्त्यालगत आरोपीच्या  शेतात मजुरीचे काम करते. ३१ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सदर पीडित मुलीचे आई, वडील त्यांच्या नातेवाईकांसह शेतात काम करण्यासाठी गेले तेव्हा त्यांची मुले पत्र्याच्या खोलीत खेळत होती. सायंकाळी आरोपी शेंडगे याने पीडित मुलीस चॉकलेट देऊन तिला जवळच असणाऱ्या स्वत:च्या घरी नेले. साडेसहा वाजण्याच्या सुमारास  पीडित मुलीची एक नातेवाईक महिला ही त्या मुलीला शोधत असताना आरोपी शेंडगे हा त्या मुलीशी अश्लील वर्तन करून तिच्यावर अत्याचार करत असल्याचे त्यांनी पाहिले. हा प्रकार मुलीचे आई वडील व नातेवाईकांना समजल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पंच्याहत्तर वर्षीय आरोपी शेंडगे याच्या विरोधात  अगोदर तक्रार देऊन नगरला तपासण्या केल्यानंतर कल शनिवारी रात्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: 75 year old man rape on four year old girl in Srigonda