सोलापूर जिल्ह्यामध्ये 7990 शिक्षक बदलीपात्र 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

सोलापूर - जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात सध्या शिक्षकांच्या बदल्यांचे वारे घोंघावत आहे. सरकारच्या 27 फेब्रुवारीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सात हजार 990 शिक्षक बदलीपात्र ठरले आहेत. त्याचबरोबर 795 जागा रिक्त आहेत. 

जिल्ह्यातील सर्वसाधारण व अवघड क्षेत्र जाहीर करण्यापासून शिक्षकांच्या बदल्यांचा विषय चर्चेत आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या तालुकास्तरीय समितीने पहिल्यांदाच 193 गावे अवघड क्षेत्रात असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर संपूर्ण जिल्हाच सर्वसाधारण असल्याचे जाहीर करून या विषयावर पडदा टाकला होता. 27 फेब्रुवारीच्या सरकारी आदेशानुसार, दहा वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांच्या जिल्हास्तरावर याद्या जाहीर करण्याची सूचना केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची त्या फाइलवर सही झाल्यानंतर जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांची यादी जाहीर केली जाणार आहे.