नऊ तालुक्‍यांची वसुली 90 टक्के

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

सातारा - जिल्हा परिषदेने घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीत यावर्षीही बाजी मारली आहे. तब्बल ८० कोटी म्हणजेच ९० टक्‍के वसुलीचा टप्पा गाठला आहे. वसुलीत नऊ तालुक्‍यांनी नव्वदी पार केली आहे. मात्र, वसुलीत खटाव तालुका सर्वांत मागे पडला आहे. 

सातारा - जिल्हा परिषदेने घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीत यावर्षीही बाजी मारली आहे. तब्बल ८० कोटी म्हणजेच ९० टक्‍के वसुलीचा टप्पा गाठला आहे. वसुलीत नऊ तालुक्‍यांनी नव्वदी पार केली आहे. मात्र, वसुलीत खटाव तालुका सर्वांत मागे पडला आहे. 

ग्रामपंचायतींसाठी करातून मिळणारे उत्पन्न हे प्रामुख्याने विकासकामांसाठी आधार असते. त्यामुळे ग्रामपंचायतींना विकासाचा गाडा हाकण्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीवर भर द्यावा लागतो. करवसुली हा ग्रामपंचायतींचा उत्पन्नाचा मुख्य मार्ग असल्याने जिल्हा परिषदेने यावर्षी ९५ टक्‍के वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. जिल्ह्यात एक हजार ४९४ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींपुढे चालू आर्थिक वर्षात ८९ कोटी २२ लाख ४६ हजार वसुलीचे उद्दिष्ट होते. फेब्रुवारीअखेरपर्यंत थकबाकीसह चालू वसुलीपोटी ६६ कोटी ६१ लाखांची वसुली झाली होती. मार्चअखेरीस सर्वत्र वसुलीचा जोर लावला गेल्यामुळे तब्बल १४ कोटींची वसुली एका महिन्यात झाली. मार्चअखेर ८० कोटी ७३ लाखांची करवसुली झाली. मात्र, अद्यापही सुमारे नऊ कोटींची वसुली न झाल्याने आता ती पुढील वर्षात वाढली जाणार आहे. 

घरपट्टीची तालुकानिहाय वसुली
 (आकडे कोटीत) 

सातारा १२.९३, कोरेगाव २.३९, खटाव ३.६४, माण २.०३, फलटण ७.२१, खंडाळा ५.१२, वाई ३.०४, जावळी १.६२, महाबळेश्‍वर १.५९, कऱ्हाड ११.८२, पाटण ५.१७. अशी एकूण ५६ कोटी ६१ लाखांची (९०.३६ टक्‍के) घरपट्टी वसुली झाली आहे. 

पाणीपट्टी तालुकानिहाय वसुली 
(आकडे कोटीत)  

सातारा ३.७०, कोरेगाव १.८६, खटाव २.८४, माण ००.८७, फलटण ३.६७, खंडाळा १.५१, वाई १.५२, जावळी ००.९४, महाबळेश्‍वर ००.३८, कऱ्हाड ४.४३, पाटण २.३४. अशी एकूण २४ कोटी ११ लाखांची (९०.९२ टक्‍के) वसुली झाली असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागातून देण्यात आली. 

Web Title: 9 tahsil recovery 90 percent