संशयाच्या कारणावरून जप्त केली दहा लाख 99 हजारांची रोकड! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

सोलापूर - पाचशे आणि एक हजाराच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर स्वत:जवळ मोठी रक्कम बाळगणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. बुधवारी शहरात दोन ठिकाणी एकूण 10 लाख 99 हजारांची संशयास्पद रोकड जप्त करण्यात आली. यात एक हजाराच्या जुन्या आणि दोन हजारांच्या नव्या नोटांचा समावेश आहे. 

पहिली घटना : चाटला चौक परिसरात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास गणेश सुभाष हुनगुंद (वय 20, रा. विद्यानगर, शेळगी) याच्याकडून तीन लाख 10 हजार रुपये जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन लाख रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या तर 10 हजार रुपयांच्या शंभरच्या नोटा होत्या. ही रक्कम कशाची आहे हे गणेशला सांगता आले नाही. तो पुण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकतोय. पोलिस उपनिरीक्षक नागेश मात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. 

दुसरी घटना : लकी चौक परिसरात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास कारमध्ये (एमएच 13-एसी 7835) सहा लाख 99 हजार रुपये सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम अमित कुरुलकर (वय 25, रा. श्रुती अपार्टमेंट, बाळीवेस, सोलापूर) यांची असून ती पेट्रोलपंपाची असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व नोटा जुन्या एक हजाराच्या आहेत. ही रक्‍कम जप्त करण्यात आली असून आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. 

Web Title: 99 thousand million in cash seized