आष्टा पालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीकडे लक्ष

आष्टा पालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीकडे लक्ष

शैलेश सावंत, संगीता सूर्यवंशी, झुंझार पाटील यांच्या नावांची चर्चा
आष्टा - थेट नगराध्यक्षांच्या व नगरमंडळाच्या निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष निवडीकडे शहरवासीयांचे लक्ष आहे. नगराध्यक्षा स्नेहा माळी तशा राजकारणात अगदीच नवख्या. उपनगराध्यक्षांवर कारभाराची जोखीम राहणार आहे. 

पालिकेत पहिल्यांचा विरोधकांची एन्ट्री झाली. विरोधकांचा सामना करीत निवडणुकीत विस्कटलेली पार्टीची मोट बांधण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागणार आहे. 

सर्वच आघाड्यांवर यशस्वी रामबाण म्हणून सर्वसमावेशक चेहरा शैलेश सावंत आणि माजी उपनगराध्यक्ष तानाजी सूर्यवंशी यांच्या पत्नी संगीता सूर्यवंशी यांची नावे पुढे येताहेत. घराणेशाहीचे कार्ड लागू झाल्यास विलासराव शिंदे यांचे पुतणे धैर्यशील शिंदे यांचे नाव पुढे येईल; पण धैर्यशील विद्यमान उपनगराध्यक्ष असल्याने नव्या चेहऱ्याला संधी मिळेल, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. पालिकेची निवडणूक अटीतटीने झाली. स्नेहा माळी यांच्याकडून लता पडळकर यांचा पराभव झाला; पण घटलेले मताधिक्‍य सर्वच सांगून गेले. पाच वर्षांसाठी महिला नगराध्यक्ष राहणार असल्याने उपनगराध्यक्ष पदाकरिता सत्ताधाऱ्यांकडून पुरुषाला प्राधान्य मिळण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटाकडून झुंझार पाटील, विशाल शिंदे, शैलेश सावंत, धैर्यशील शिंदे, शेरनवाब देवळे हे विजयी झाले आहेत. पैकी झुंझार यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे, तर विशाल यांनी यापूर्वीच उपनगराध्यक्षपद भूषविले आहे. ते प्रतोदही होते. दोघांना रस नाही. शैलेश सावंत, धैर्यशील, विलासरावांचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. राज उद्योग समूहाच्या माध्यमातून चांगले नेवटवर्क आहे. पार्टीची मोट बांधण्याची धमक आहे. २००६ च्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली होती.

उपनगराध्यक्ष होते. २०११ च्या निवडणुकीत पत्नी रागिणी या नगराध्यक्षपदाच्या दावेदार होत्या. त्यामुळे त्यांना संधीची शक्‍यता आहे. 

संगीता सूर्यवंशींना प्राधान्य
पालिकेत महिलाराज आहे. संगीता सूर्यवंशी यांनी २०११ व २०१६ अशी दुसऱ्यांना विजयश्री खेचून आणली. त्या माजी उपनगराध्यक्ष, शिवनेरी उद्योग समूहाचे संस्थापक तानाजी सूर्यवंशी यांच्या पत्नी आहेत. सूर्यवंशी यांच्या गटाचा दबदबा आहे. २०१३ मध्ये संगीता सूर्यवंशी, रागिणी सावंत यांना प्रत्येकी १०- १० महिने नगराध्यक्षपदाचे आश्‍वासन मिळाले होते; पण ते मिळाले नसल्याने गटात नाराजी होती. पुन्हा उमेदवारी मिळाली.

नगराध्यक्षपदाची हुकलेली संधी, गटाची नाराजी उपनगराध्यक्षपद देऊन दूर केली जाण्याची शक्‍यता आहे. नगराध्यक्षपदी महिला असल्याने महिलेलाच संधी म्हणून संगीता सूर्यवंशी यांचे नाव आघाडीवर आहे. शहरात उपनगराध्यक्षपदावरून नाराजी नाट्य रंगणार असल्याने नेते कसा मार्ग काढतात, याकडे नजरा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com