रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे होणार विभाजन

रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे होणार विभाजन

नगर - भाजप-सेना युतीच्या सरकार मध्ये काम करूनही चार वर्षात आंबेडकरी जनतेचे प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिकच जटिल होत चालले असल्याची भावना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आरपीआय कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे आरपीआय आठवले गटाचे नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध आंबेडकरी विचाराच्या सामाजिक संघटना यांना एकत्र घेऊन युनायटेड रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्यात येणार आहे. या नवीन पक्षाची घोषणा व पहिली जाहीर सभा 4 ऑगस्ट रोजी नाशिक येथे होईल अशी माहिती ज्येष्ठ आंबेडकरी नेते अशोक गायकवाड यांनी दिली.

आरपीआय आठवले गटाचे प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व प्रदेश सचिव व प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी सुयोग भिंगारदिवे, यशवंत भांबळ, राजू भिंगारदिवे, साजिद शिलेदार, कन्हैया भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com