अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार; नराधमावर पोक्सो

abduction of a minor girl torture Belagavi
abduction of a minor girl torture Belagavi sakal

बेळगाव : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शनिवार (ता.२२) उघडकीस आली आहे. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी परवेज उर्फ राहुल जुबेर शहा (वय २०, रा. उत्तर प्रदेश) या संशयिताला अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.(abduction of a minor girl)

abduction of a minor girl torture Belagavi
UP Election : आझम खान यांची अंतरिम जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव

२८ डिसेंबर २०२१ रोजी त्याने नानावाडी पासून काही अंतरावर असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. तो सावगाव येथील एका नर्सरीमध्ये कामाला होता. त्या ठिकाणी संशयित आणि पीडित युवतीशी त्याचा संपर्क आला. यातूनच त्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. त्यामुळे याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

abduction of a minor girl torture Belagavi
जिओ 1000 शहरांमध्ये 5G लाँच करण्याच्या तयारीत

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आज वरील संशयिताला अटक केली. त्याच्यावर अपहरण आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेऊन जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. पोलीस निरीक्षक सूनिलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com