अबू: "इलेक्‍ट्रिशियन ते कुख्यात दहशतवादी...'

अबू: "इलेक्‍ट्रिशियन ते कुख्यात दहशतवादी...'

औरंगाबाद - गेवराईसारख्या छोट्या गावात जडणघडण झालेला अबू जिंदाल ऊर्फ जबीउद्दीन अन्सारी तांत्रिक शिक्षण घेऊन इलेक्‍ट्रिशयन बनला. मात्र, त्याची प्रवृत्तीच हिंसक होती, मुळात त्याचा ओढाही हिंसकतेकडे होता. त्यातून त्याच्या विचारांना खतपाणी मिळत गेले, त्याच्यासह बीडच्या अनेक तरुणांची माथी भडकावण्याचे काम झाले. ब्रेनवॉशिंगही करण्यात आले. यातून अबू जहाल विचारांचा बनला. दहशतवादाशी संबंधित एकेक लोक भेटत गेल्यानंतर त्याच्यातील दहशतवादी जागा होत गेला. त्याची लिंकिंगही फैयाज कागजीसोबतच दहशतवाद्यांशी वाढत गेली. गुजरात दंगलीनंतर त्याने देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा विडाच उचलला होता. 


महाविद्यालयीन जीवनातच अबूचा फैयाज कागजीशी संबंध आला. त्याच्या प्रभावानंतर तो दहशतवादाकडे वळला होता. 2000 मध्ये अबू जिंदाल दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात गेला. तेथील लष्कर-ए-तोयबा व इंडियन मुजाहीदिन या जहाल दहशतवादी संघटनेत भरती झाला. तेथे दहशतवादाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला विशेष प्रमोशन देण्यात आले. अबूने बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षणही घेतले होते. देशात परतल्यानंतर स्लीपरसेलच्या मदतीने तो घातपाती कारवायात सक्रिय झाला. याचदरम्यान वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणात पोलिसांना चकमा देऊन तो भारताबाहेर पसार झाला. त्याने सौदी अरबियात शिक्षक म्हणूनही काम केले. नव्याने दहशतवादी संघटनेत सामील होणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. अनेकांचे मतपरिवर्तन करून दहशतवादी बनवण्यात त्याचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. त्याची किमान दहा बनावट नावे असल्याचेही समोर आले आहे. पाकिस्तानसह श्रीलंका, बांगलादेश येथेही त्याचे वास्तव्य होते. या काळात त्याची दहशतवादी कारवायात सक्रियता मोठी होती. त्याने देशातील तरुणांची माथी भडकावण्याचे काम केले. यातूनच त्याने दहशतवादी शिबिरे घेत देशात दहशतवादीकृत्ये केली. 
 

तीस नोव्हेंबर 1980 ला त्याचा गेवराई (जि. बीड) येथे जन्म झाला. येथील हाथीखाना येथे त्याचे वास्तव्य होते. मुलांच्या जिल्हा परिषद शाळेत त्याचे शिक्षण झाले. त्यानंतर कुटुंबीयांसह बीड येथे राहायला गेला होता. तेथे त्याने आयटीआयमधून इलेक्‍ट्रिशियनचा कोर्स केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com