लोणंद-नीरा रस्त्यावर अपघात, तीन ठार, सहा जखमी

मेश धायगुडे
सोमवार, 11 जून 2018

लोणंद - लोणंद-नीरा रस्यावर पाडेगाव (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत जीप नीरा उजव्या कालव्यात वाहात्या पाण्यात पडून तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले. मृतांमध्ये चार वर्षाच्या एक मुलगा व नऊ वर्षाच्या एका मुलीचा समावेश आहे. वावरहिरे (ता.माण) येथील हे कुंटुबीय मुंबईकडे निघाले असताना रात्री सव्वा अकरा वाजता हा आपघात झाला.

बल्लाळ व साळुंखे कुटुंबीय भाग्यश्री टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स जीप क्रमांक (एमएच-४२-अेक्यू - ५७४ मधून) मुंबईला निघाले होते. रात्री लोणंद नजीकच्या एका धाब्यावर थांबून त्यांनी जेवण केले. त्यावेळी महेश बल्लाळ यांनी मद्य प्राशन केले. त्याच अवस्थेत तो गाडी चालवू लागला. 

दरम्यान, त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी नीरा उजव्या कालव्यात वाहात्या पाण्यात पडून हा अपघात झाला.त्यामध्ये महेश जगन्नाथ बल्लाळ (वय २६), दाद गोरख बल्लाळ (वय ४) हे दोघे रा.बल्लाळवाडी आणि सृष्टी संतोष साळुंखे (वय ९) रा.दावलेवाडी हे तीन जण मृत्यू पावले आहेत तर संतोष दादासो साळुंखे (वय ३४),गोरख सुरेश बल्लाळ (वय ३३), अंविता संतोष साळुंखे (वय ३३), सुजल संतोष साळुंखे (वय १२) उज्वला गोऱख बल्लाळ (वय २६) हे जखमी झाले आहे. त्यांना लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

दरम्यान, या अपघाताचा आवाज ऐकताच शेजरच्या नवले कुटुंबीयांतील युवकांनी घटनास्थळी जावून अपघातग्रस्तांना मदत केली. घटनास्थळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे व त्यांचे सहाकऱ्यांनी धाव घेवून ग्रामस्त निखिल नवले, रोहित नवले, हावलदार अविनाश शिंदे,हावलदार रोहित गायकवाड यांनी पाण्यात उड्या मारुन जीपमध्ये आडकलेल्या प्रवाशांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढून गाडीतून लोणंद येथे खाजगी रुगणालयात आणले. याबाबत सुधिर किशोर बल्लाळ (वय २७) रा.वावरहिरे ता.माण यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

Web Title: Accident, three killed and six injured on Lonand-Neera road