कोपर्डी अत्याचार व खुनातील आरोपीचे वकील पुन्हा गैरहजर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

नगर - कोपर्डी अत्याचार व खुनातील आरोपी संतोष भवाळ याचे वकील बाळासाहेब खोपडे आज सुनावणीसाठी गैरहजर राहिले. आरोपी भवाळने दिलेला त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. खोपडे यांच्याऐवजी योहान मकासरे यांनी तपासी अधिकारी शिवाजी गवारे यांची उर्वरित उलटतपासणी घ्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला; मात्र मकासरे यांनी त्यास नकार दिला. दुपारच्या सत्रात आरोपी नितीन भैलुमे याच्यातर्फे प्रकाश आहेर यांनी गवारे यांची उलटतपासणी घेतली.

दरम्यान, पुढील सुनावणी 22 ते 24 मेदरम्यान होणार आहे. त्या वेळी आहेर हे नोडल अधिकाऱ्यांची उलटतपासणी घेतील. नंतर गरजेनुसार गवारे यांची उलटतपासणी घेतली जाणार आहे.