बोगस डॉक्‍टरवर नरवाडला कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

मिरज - अधिकृत पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या संजय गंगाराम कबाडगे (वय 30, लोकूर, ता. अथणी, जि. बेळगाव) याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने काल दवाखान्यावर छापा टाकला होता. 

तालुका आरोग्याधिकारी डॉ. विजय सावंत यांनी ही माहिती दिली. डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल सायंकाळी सात वाजता नरवाडमध्ये लक्ष्मीनगर भागात कबाडगेच्या दवाखान्याची तपासणी केली. त्याच्याकडे अधिकृत कागदपत्रांची विचारणा केली असता ती नसल्याचे स्पष्ट झाले. कारवाईत म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. एन. व्ही. खंदारे, विस्ताराधिकारी शामराव इंगळे, अजयकुमार जायाप्पा, सहायक सुरेश कांबळे, शिवाजी खाडे यांनी भाग घेतला. 

Web Title: Action on the bogus doctor in Narvad