'मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

सोलापूर - राज्यात सध्या अवकाळी पाऊस व वादळामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. अशा काळात सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. 

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष परिमंडल स्तरावर काम करणाऱ्या कनिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याशी सोमवारी (ता. 15) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संजीव कुमार थेट संवाद साधला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. त्यामुळे ग्राहकांना मोबाईलद्वारे महावितरणच्या विविध सेवा उपलब्ध करून देता येईल. तसेच, जनमित्र व तंत्रज्ञ यांनी संबंधित गावातच राहावे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींची त्यांना तातडीने दखल घेता येईल व ग्राहकांशी सुसंवाद राहील. त्यातून वीजबिलाची वसुलीही चांगल्या प्रमाणात होईल, असे मत संजीव कुमार यांनी व्यक्त केले. 

तसेच, कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक असून, कर्मचाऱ्यांनी कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वसुलीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करावेत, असे निर्देशही संजीव कुमार यांनी दिले. 

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - शेतीत गुंतवणूक करायची असते; पण शेतकरी, गुंतवणूकदार आणि खरेदीदार यांच्यात कायदेशीररीत्या ताळमेळ साधायचा कसा, असा प्रश्...

11.33 AM

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) शुक्रवारी झालेली सभा बेकायदेशीर ठरवून ती रद्द करावी, अध्यक्षांसह संचालक व...

11.33 AM

कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेतील गोंधळावरून आता आमदार सतेज पाटील व माजी आमदार...

11.33 AM