सहायक आयुक्तांना लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

सोलापूर - सोलापूर महापालिकेत आवेक्षक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला मुदतवाढ देऊन आठ महिन्यांचे वेतन अदा करण्यासाठी वीस हजारांची लाच स्वीकारणारे महापालिका सहायक आयुक्त प्रदीप एकनाथ साठे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी पकडले.

तक्रारदार व्यक्ती गेल्या तीन वर्षांपासून आवेक्षक पदावर महापालिकेत कार्यरत आहे. आठ महिन्यांपूर्वी त्यांची मुदत संपली. मुदतवाढ मिळण्यासाठी साठे यांनी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. संबंधित व्यक्तीला साठे यांनी शुक्रवारी दुपारी पैसे घेऊन नॉर्थकोट प्रशाला परिसरातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात बोलाविले होते. तेथे लाच स्वीकारताना साठे यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.