सोलापूर शहराला 17 मे पर्यंत चार दिवसाआड पाणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

सोलापूर - औज बंधारा आणि टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातील पाणी संपल्याने 17 मेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

टाकळी पंपगृहाजवळ असलेल्या जॅकवेलची पातळी मंगळवारी सायंकाळी फक्त दोन फूट होती. सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी बंधाऱ्यात पोचण्यास किमान आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे पाणी औज व चिंचपूर बंधाऱ्यात पोचल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा नियमित होण्यास मदत होणार आहे. दरम्यानच्या कालावधीत अंदाजे 17 मे पर्यंत सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.